विश्वसंचार

आणखी किती वर्षे राहणार पृथ्वी?

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीचा किंवा जगाचा अंत होणार का, याबाबत अभ्यासकांमध्ये साहजिकच अनेक मतमतांतरे आहेत. काहींना जगाचा अंत निश्चित आहे, असे वाटते तर काहींना यात कोणतेही तथ्य वाटत नाही. त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो की, आणखी किती वर्षे पृथ्वी जशी आहे तशी राहील?

जगात जे काही अस्तित्वात आले, ते केव्हा तरी नष्ट होणार, हे आजवरचे निसर्गचक्र सांगत आले आहे. 4 ते 5 अब्ज वर्षांपूर्वी सौरमंडळ तयार झाले, त्यावेळी पृथ्वीची निर्मिती झाली होती, असे मानले जाते.

पृथ्वीवरील आयुष्य हे सूर्यामुळेच आहे. म्हणजे जोपर्यंत सूर्य राहणार तोपर्यंत पृथ्वी राहणार यावरही बहुमत आहे. सूर्यामध्ये इनेक न्यूक्लिअर रिअ‍ॅक्शन होत असतात. या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्शनमुळेच ऊर्जा बनते. न्यूक्लिअर रिअ‍ॅक्शन बंद झाल्यास सूर्याचा विस्तार होईल. यानंतर सूर्य रेड जाएंट बनेल. हे रेड जाएंट पृथ्वीलाही घेरेल. ज्यामुळे पृथ्वीचा अंत होईल, असे सांगितले जाते. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार सूर्य जवळपास 5 अब्ज वर्षे धगधगत राहील. म्हणजे इतकी वर्षे सूर्याचा अंत आहे. याचा अर्थ सूर्यावर अवलंबून असणार्‍या पृथ्वीचेही आयुष्य तितकेच असेल, असे मानले जाते.

SCROLL FOR NEXT