History of English Language | इंग्लंडने कशी शिकली स्वतःचीच प्राचीन भाषा?  
विश्वसंचार

History of English Language | इंग्लंडने कशी शिकली स्वतःचीच प्राचीन भाषा?

'टेक्स्टस्‌ रॉफेन्सिस' हस्तलिखिताच्या रहस्यावरून पडदा!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सोळाव्या आणि सतराव्या शतकात जेव्हा इंग्लंडमधील विद्वानांनी पहिल्यांदा आपल्याच देशाच्या प्राचीन इतिहासाचा आणि भाषेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा मेळ घालताना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. या रंजक इतिहासावर प्रकाश टाकणारा संशोधक रेबेका ब्रॅकमन यांचा विशेष लेख प्रसिद्ध ‘हिस्‍ट्री टुडे’मध्‍ये प्रसिद्ध झाला आहे.

एका जुन्या हस्तलिखिताचे रहस्य

१५७३ मध्ये विख्यात कायदेतज्ज्ञ आणि पुरातत्त्वप्रेमी विल्यम लॅम्बार्ड यांनी जुन्या इंग्रजीतील (ओल्‍ड इंग्‍लिश) एका अतिप्राचीन हस्तलिखिताच्या (मॅन्‍युस्‍क्रिप्‍ट) कोपऱ्यावर लॅटिन भाषेत एक संदेश लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘तुम्ही कोणीही असा, ज्याला हे पुस्तक सापडले आहे, तुम्ही या पुस्तकाला खूप मोठे मूल्य दिले पाहिजे.’ खाली त्यांनी स्वाक्षरी केली होती, ‘प्राचीनतेच्या कृपेसाठी - डब्ल्यू. एल.’

हे पुस्तक म्हणजे कोणतेही महाकाव्य किंवा धार्मिक ग्रंथ नव्हता, तर ते होते 'टेक्स्टस रॉफेन्सिस'. हा १२ व्या शतकातील असा संग्रह आहे, त्‍यामध्‍ये इंग्लंडवर नॉर्मन लोकांनी ताबा मिळवण्यापूर्वीचे कायदे आणि कायदेशीर नोंदी गोळा करून ठेवण्यात आल्या होत्या. हे हस्तलिखित रोचेस्टर कॅथेड्रलच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित आहे. इंग्रजी भाषेचा बदलता प्रवास सध्या रोचेस्टर कॅथेड्रलने लॅम्बार्ड यांच्या मार्जिनमधील त्या संदेशाचे भाषांतर केले असून, तिथल्या तळघरात या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रदर्शन भरवले आहे. हा इतिहास दाखवतो की, आज आपण जी इंग्रजी भाषा बोलतो, ती जुन्या काळातील इंग्रजीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. १६ व्या शतकातील विद्वानांनी जुन्या इंग्रजीचा अभ्यास केवळ भाषा म्हणून केला नाही, तर इंग्लंडचे प्राचीन कायदे आणि तिथली संस्कृती समजून घेण्यासाठी केला. हा शोध आधुनिक काळातील इतिहासकारांना इंग्लंडच्या कायदेशीर आणि भाषिक मुळांपर्यंत घेऊन जाणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT