Dubai Drinking Water | एकही नदी नसताना दुबईकरांची तहान कशी भागवली जाते?  
विश्वसंचार

Dubai Drinking Water | एकही नदी नसताना दुबईकरांची तहान कशी भागवली जाते?

पुढारी वृत्तसेवा

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईत न कोणती मोठी नदी आहे किंवा गोड्या पाण्याचा कोणताही नैसर्गिक स्रोत, तरीही येथील लाखो लोकांच्या घरात, हॉटेलात आणि गगनचुंबी इमारतीत दरदिवशी पाणी पोहोचते. प्रश्न आहे की अखेर हे पाणी येथे कुठून? याचे उत्तर तुम्हाला आश्चर्यकारक वाटू शकेल. दुबईतील पाण्याची मोठी गरज समुद्राद्वारे भागविली जाते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याला स्वच्छ करून दुबईची तहान भागविली जाते.

दुबई इलेक्ट्रीसिटी एंड वॉटर अथॉरिटी म्हणजे DEWA च्या मते शहरातील समुद्राच्या पाण्याला डिसेलिनेशन प्लांटमध्ये घेऊन जाऊन पिण्यालायक बनवले जाते. यासाठी सी वॉटर रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे SWRO सारखे तंत्रज्ञान वापरले जाते. या प्रक्रियेत समुद्राचे पाण्याला खास मेम्ब्रेनमधून नेले जाते. यावेळी या पाण्यातून मीठ आणि अन्य अशुद्ध घटक वेगळे केले जातात. DEWA च्या २०२५ च्या सस्टेनेबिलिटी रिपोर्टनुसार त्या वर्षांच्या अखेरपर्यंत दुबई डिसेलिनेटेड पाणी तयार करण्याची स्थापित क्षमता ४९५ मिलियन इम्पीरियल गॅलन प्रतिदिन होती. २०२५ मध्ये DEWA ने एकूण १५८,३५९ मिलियन इम्पीरियल गॅलन डिसेलिनेटेड पाण्याची निर्मिती केली. याच वर्षी २५ ऑगस्ट रोजी पाण्याची रोजची मागणी ४८७ मिलियन इम्पीरियल गॅलनपर्यंत पोहचली होती. दुबईत भुजल साठे नाहीतच असे नाही, परंतू याचा वापर मुख्य रुपाने आपत्कालिन आणि गरजेच्या वेळी केले जाते. DEWA च्या आकड्यानुसार २०२५ मध्ये विहिरीत सरासरी १.१५५ मिलियन इम्पिरियल गॅलन प्रतिदिन पाणी काढले आहे. या तुलनेत डिसेलिनेटेड पाण्याचे उत्पादन शेकडो मिलियन इम्पीरियल गॅलन प्रतिदिन राहिले. DEWA च्या नुसार जेबेल अली पॉवर एंड डिसेलिनेशन कॉम्प्लेक्सला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील सर्वात मोठी सिंगल - साईट वॉटर डिसेलिनेशन फॅसिलिटीच्या रुपात मान्यता दिली आहे. याची उत्पादन क्षमता ४९० मिलियन इम्पिरियल गॅलन प्रतिदिन म्हटली जात आहे. तसेच हस्यानमध्ये १८० मिलियन इम्पीरियल गॅलन प्रतिदिन क्षमता एक मोठ्या सी वॉटर रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोजेक्ट विकसित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT