Treeless countries | ‘या’ देशांमध्ये आहे झाडांची उणीव 
विश्वसंचार

Treeless countries | ‘या’ देशांमध्ये आहे झाडांची उणीव

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे गात झाडा-झुडपांच्या सान्निध्यात राहणे म्हणजे स्वर्गसुखच आहे; मात्र अनेक देश असे आहेत, जिथे हे सुख नाही. जगातील असे काही देश जिथे एकही झाड नसतानादेखील तेथील लोक कसे राहतात, हे जाणून घेऊया...

मानवाच्या जीवनासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असून झाडे त्याचा मुख्य स्रोत मानली जातात; मात्र जगात काही असे देश आहेत, जिथे झाडांची संख्या अत्यंत कमी किंवा जवळपास नाहीच. तरीही तेथील लोक सामान्यपणे जीवन जगत आहेत. ग्रीनलँड हा देश नावाने ‘ग्रीन’ असर्लों तरी बहुतांश भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असल्याने येथे मोठी झाडे वाढू शकत नाहीत. अत्यंत थंड हवामान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे वनस्पतींची वाढ मर्यादित आहे. ओमानमध्येही बहुतेक भाग कोरडा आणि वाळवंटी आहे.

एकेकाळी येथे वनक्षेत्र जवळपास शून्य होते. सध्या हिरवळ वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. कतार हा श्रीमंत आणि आधुनिक देश वाळवंटी असल्याने येथे नैसर्गिक हिरवळ खूपच कमी आहे. कमी पर्जन्यमानामुळे झाडे वाढणे कठीण होते. तरीही सरकार कृत्रिम जंगल उभारण्याचे प्रयत्न करत आहे. याशिवाय मोनॅको आणि व्हॅटिकन सिटी सारख्या अतिशय शहरीकृत देशांमध्येही नैसर्गिक वनक्षेत्र नाही. तसेच लिबियामध्ये सहारा वाळवंटाचा मोठा भाग असल्याने झाडे कमी आहेत. जरी झाडे कमी असली तरी या देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT