Earth destruction | भविष्यात पृथ्वीचा असा होईल विनाश? 
विश्वसंचार

Earth destruction | भविष्यात पृथ्वीचा असा होईल विनाश?

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क ः नॉस्ट्रॅडॅमस आणि बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी धक्कादायक आणि भीतीदायक आहेत; पण आता त्यांच्या भविष्यवाणीपेक्षाही अधिक भीतीदायक काहीतरी समोर आले आहे. ‘नासा’च्या सुपरकॉम्प्युटरने एक धक्कादायक पण अविश्वसनीय भविष्यवाणी केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील आजचे जीवनही संपुष्टात येईल. हे युद्ध किंवा प्रदूषणामुळे नाही, तर सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे आणि प्रखरतेमुळे होईल. हा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, काझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर टी. रेनहार्ड यांनी हे संशोधन ‘नेचर जिओसायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे. या सुपरकॉम्प्युटरच्या मते, 1 अब्ज वर्षांनंतर पृथ्वीवरील जीवनाचा अंत होईल. सर्व सजीव आणि मानवजात नष्ट होईल. सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे आणि प्रकाशामुळे पृथ्वीवर स्फोट होतील, ज्यामुळे पृथ्वीत छिद्रे निर्माण होतील. ऑक्सिजन गळतीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी होईल, ज्यामुळे माणसे आणि प्राणी यांना श्वास घेणे अशक्य होईल.

‘नासा’चे शास्त्रज्ञ काझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर टी. रेनहार्ड यांनी केलेले संशोधन ‘नेचर जिओसायन्स’ जर्नलमध्ये छापण्यात आले आहे. दोन्ही शास्त्रज्ञांच्या मते, पूर्वीच्या संशोधनानुसार 2 अब्ज वर्षांत पृथ्वी आणि जीवनाचा अंत होईल असे भाकीत केले होते, तर नवीन संशोधनानुसार पृथ्वी आणि जीवनाचा अंत 1 अब्ज वर्षांच्या आत होईल. 1 अब्ज वर्षांपर्यंत पृथ्वीच्या हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा कमी असेल. शास्त्रज्ञ ओझाकी आणि रेनहार्ड यांचा असा युक्तिवाद आहे की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पृथ्वीवरील जीवनाचा अंत होईल. त्यानंतर सूर्याची वाढती उष्णता जीवनाचा नाश करेल.

ऑक्सिजनशिवाय मानव आणि प्राणी मरतील. वनस्पती आणि झाडे वाळून जातील, फक्त जीवाणूंचे जीवन शिल्लक राहील. हे आजपासून सुमारे 10,000,000 वर्षांनी घडेल. प्रथम ऑक्सिजनची कमतरता भासेल, त्यानंतर सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वी कोरडी पडेल. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीचे कार्बोनेट-सिलिकेट चक्र आणि सूर्यप्रकाशामुळे ऑक्सिजनची घट होईल. आज वनस्पती आणि सूक्ष्मजीव ऑक्सिजन तयार करतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात; परंतु भविष्यात ते अशा उष्णतेत टिकू शकणार नाहीत. वनस्पती आणि सूक्ष्मजीव नष्ट होतील, तेव्हा ऑक्सिजनचे उत्पादन थांबेल. ऑक्सिजन कमी होईल आणि सूर्याची उष्णता वाढेल, ज्यामुळे पृथ्वी कोरडी पडेल. हळूहळू, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीवसृष्टी नष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT