विषारी अन्न खाऊनही प्राणी कसे जगतात? (Pudhari File Photo)
विश्वसंचार

How Animals Survive Toxic Food | विषारी अन्न खाऊनही प्राणी कसे जगतात?

जगातील अनेक प्राणी त्यांच्या भक्षकांच्या हल्ल्यापासून किंवा प्रतिस्पर्धकांपासून वाचण्यासाठी विषारी रसायने (टॉक्सिन्स) तयार करतात किंवा अन्नातून मिळवून साठवतात.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जगातील अनेक प्राणी त्यांच्या भक्षकांच्या हल्ल्यापासून किंवा प्रतिस्पर्धकांपासून वाचण्यासाठी विषारी रसायने (टॉक्सिन्स) तयार करतात किंवा अन्नातून मिळवून साठवतात. अशा जीवघेण्या विषारी पदार्थांना तोंड देण्यासाठी, इतर प्राण्यांनी उत्क्रांतीच्या माध्यमातून अनेक संरक्षण यंत्रणा चतुराईने विकसित केल्या आहेत, ज्यामुळे ते विषारी अन्न खाऊनही मृत्यूला चकवा देतात.

विष-प्रतिबंधाचे (अँटिटॉक्सिन) प्रमुख मार्ग

विषारी भक्ष्य खाल्ल्यानंतरही प्राणी जिवंत राहण्यासाठी मुख्यतः तीन प्रकारच्या युक्त्या वापरतात. 1. लक्ष्य प्रथिनांमध्ये बदल (अल्टरेड टार्गेट प्रोटिन्स) : यामध्ये विषाचा परिणाम शरीरातील ज्या महत्त्वाच्या प्रथिनांवर (प्रोटिन्स) होतो, जसे की सोडियम-पोटॅशियम पंप, त्या प्रथिनांमध्ये प्राणी जनुकीय बदल (जेनरिक म्युटेशन) करतात. यामुळे विषारी रेणू (टॉक्सिक मोलेक्युल्स) त्या प्रथिनांना बांधू शकत नाही, परिणामी पेशींची (सेल्स) कार्यप्रणाली सुरळीत राहते. विषारी मिल्कवीड वनस्पती खाणार्‍या मोनार्क फुलपाखराच्या अळीमध्ये (सुरवंट) असे बदल झालेले संशोधातून पुढे आले आहे

2. विष काढून टाकणे किंवा निष्प्रभ करणे : काही प्राणी त्यांच्या पेशींच्या आवरणांमध्ये एबीसीबी ट्रान्सपोर्टर नावाचे प्रथिने विकसित करतात. ही प्रथिने विषारी पदार्थ शरीरात शोषले जाण्यापूर्वीच आतड्यांतून किंवा मज्जातंतूंच्या जवळून बाहेर टाकतात. काही साप किंवा गिलहरी यांच्या यकृत/रक्तामध्ये असे एंझाइम्स किंवा प्रथिने आढळतात, जे विषाचे रूपांतर बिनविषारी स्वरूपात करतात. (उदा. मानवी शरीर अल्कोहोल किंवा निकोटीनसोबत करते.) अमेरिकेतील कॅलिफोर्निया ग्राऊंड गिलहरीच्या रक्तात साप विषरोधक प्रथिने असतात, जी रॅटलस्नेकच्या विषाला निष्प्रभ करतात.

3. वर्तणुकीतून विष टाळणे : अनेक प्राणी विषारी भक्ष्य पूर्णपणे खाण्याऐवजी त्यांच्या शरीराचे विष नसलेले भाग खाणे निवडतात. उदाहरणार्थ : काही साप पोयझन डार्ट फ्रॉग गिळण्यापूर्वी त्यांना जमिनीवर घासून त्यांच्या त्वचेवरील विषारी लेप कमी करण्याचा प्रयत्न करतात. तसेच, मोनार्क अळ्या मिल्कवीडमधील विषारी द्रव बाहेर काढण्यासाठी पानांच्या शिरा कापतात. विषाचा वापर आत्मसंरक्षणासाठी काही प्राणी (उदा. इरिडेसेंट डॉगबेन बीटल आणि मोनार्क फुलपाखरे) जे विष अन्नातून मिळवतात, ते नष्ट न करता ते आपल्या शरीरात सुरक्षितपणे साठवतात. नंतर तेच विष ते स्वतःचे संरक्षण कवच म्हणून भक्षकांविरुद्ध वापरतात. त्यांच्या चमकदार रंगांमुळे ते, मी विषारी आहे, असा इशाराच भक्षकांना देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT