52 inch wide house | केवळ 52 इंच रुंदीचे घर Pudhari File Photo
विश्वसंचार

52 inch wide house | केवळ 52 इंच रुंदीचे घर

पुढारी वृत्तसेवा

पाटणा : सध्या सोशल मीडियावर 52 इंच रुंदीच्या एका दोन मजली घराचा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. ‘52 इंच हाऊस’ असे नावच असलेल्या या अनोख्या घराच्या होम टूरचा व्हिडीओ बिहारमधील एका कंटेंट क्रिएटर आदित्यने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट @adityaseries01 वर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत की इतक्या कमी जागेतही घरातील सर्व सुख-सुविधा आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की घर इतके अरुंद आहे की दरवाजा उघडताच कंटेंट क्रिएटर आपले हातही नीट पसरू शकत नाही. पण, इतक्या लहान घरातही सर्व आवश्यक वस्तू आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आत जाताच समोर एक लहानसे देवघर आहे. त्याच्या शेजारीच तीन फूट रुंद बेड आहे. त्यानंतर एक व्यवस्थित स्वयंपाकघर आहे, ज्यात प्रत्येक गोष्टीसाठी शेल्फ बनवलेली आहे आणि भांडी भिंतीवर योग्य पद्धतीने लावून ठेवली आहेत. या घरात वॉशरूम आणि बाथरूम वेगळे आहेत.

सर्वात खास गोष्ट ही आहे की या दोन मजली घरात वर जाण्यासाठी जीने देखील बनवलेले आहेत. मात्र, त्या इतक्या अरुंद आहेत की एका वेळी फक्त एकच व्यक्ती वर किंवा खाली जाऊ शकते. कंटेंट क्रिएटरनुसार, हे घर 50 फूट लांब आणि 4 फूट 4 इंच रुंद आहे. दोन दिवसांत या व्हिडीओला 1 कोटीपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ किती लोकप्रिय झाला आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसेच व्हिडीओला 1 लाख 77 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “मला तर पाहताच श्वास घेणे कठीण झाले. व्हेंटिलेशनसुद्धा नाही. मी तिथे राहण्याची कल्पनाही करू शकत नाही.” दुसर्‍या युजरने म्हटले, “जसेही आहे, पण आपले तरी आहे.” एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले, “सर्वकाही आहे, पण ऑक्सिजनची कमतरता आहे.” तर, आणखी एका युजरने हृदयस्पर्शी कमेंट केले, “गरीब माणसाचे स्वतःचे घर बनले तरी ते मोठी गोष्ट आहे. ते किती मोठे किंवा किती लहान आहे, याचा काही फरक पडत नाही.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT