Heart protective factors | हृदयाची कवचकुंडले Pudhari File Photo
विश्वसंचार

Heart protective factors | हृदयाची कवचकुंडले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या सवयी आपले व्यक्तिमत्त्व घडवित असतात, त्याचा संबंध थेट आरोग्याशीही असतो. धकाधकीच्या जीवनात या सवयी बदलत असल्या तरी काही पथ्ये पाळली आणि तंतूयुक्त आहाराचा पुरेसा वापर ठेवला तर आरोग्यासाठी ते उपकारकच ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.

तुम्ही कदाचित ऐकले असेल की, जास्त फायबर खाणे तुमच्या आतड्यांसाठी चांगले आहे. परंतु, त्याचे फायदे पचनापेक्षा खूप जास्त आहेत. फायबर तुमच्या हृदयाचे रक्षण करण्यातही एक शक्तिशाली भूमिका बजावू शकते. अगदी रक्तदाब स्थिर ठेवण्यापासून ते एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यापर्यंत आणि जळजळ कमी करण्यापर्यंत. तुमच्या दैनंदिन जेवणात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट केल्याने तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर खूप मोठा फरक पडू शकतो. असा फायबरयुक्त आहार म्हणजे हृदयासाठी कवचकुंडलेच ठरतात.

हृदयरोगतज्ज्ञ आणि हृदय-प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या मते, फायबर केवळ आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर ते तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने हृदयाच्या आरोग्यासासाठी लक्षणीयरीत्या लाभकारक ठरू शकते. “फायबर ही फक्त आतड्याच्या आरोग्यासाठीच नव्हे तर ते प्रत्यक्षात तुमच्या हृदयावरील दबाव कमी करण्याचे कामही करते,” असे ते सांगतात.

हृदय व रक्तवाहिन्याचे आरोग्य चांगले राखण्यात फायबर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण, अपचनामुळे होणार्‍या पित्ताच्या त्रासामुळे हृदयावरील दबाव वाढतो. तो ताण कमी करण्यास फायबर मदत करते. ते साखरेचे शोषण कमी करते, इन्सुलिन कमी करते, एलडीएल कमी करते आणि जळजळ कमी करते. आहारात दैनंदिन फायबरचा उपयोग ठेवण्यामुळे नैसर्गिकरित्याच हृदयरोग आटोक्यात ठेवता येतो तसेच वजनही व्यवस्थित राखता येते. हृदयरोगतज्ज्ञ सांगतात, “जे लोक जास्त फायबरयुक्त खातात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी असते, रक्तदाब स्थिर असतो, कोलेस्ट्रॉल चांगले असते आणि वजन नियंत्रण चांगले असते... तेही कसलीही औषधे न घेता.” त्यामुळे फायबरयुक्त आहाराबाबत सजग राहणं कधीही चांगलंच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT