मेक्सिको : सकाळच्या घाईगर्दीच्या वेळेत फिरायला जाणे अनेकांना शक्य होत नाही; पण ज्यांना सायंकाळी फिरण्यासाठी वेळ मिळतो, त्यांनी ती संधी अजिबात दवडू नये, असे अभ्यासकांचे मत आहे. आपण सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाता तेव्हा त्याला सनसेट वॉक म्हणतात. यामध्ये संध्याकाळच्या सुंदर द़ृश्यांचा आनंद घेत फिरू शकतो, यामुळे संपूर्ण दिवसाचा ताण कमी होईल आणि बरे वाटेल. तसेच हा टाईम नेचरशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचा खराब मूड सुधारण्यासाठी काळ सर्वोत्तम आहे, असे एका अभ्यासकांच्या पथकाने म्हटले आहे.
सूर्यास्ताच्या वेळी चालण्याचे अनेक फायदे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे दिवसभराच्या धावपळीनंतर आणि जबाबदार्या पूर्ण केल्यानंतर निसर्गाच्या जवळ जाऊन दिवसाचा सर्व ताण कमी करता येतो. सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाण्याने मनाला शांती मिळते. सूर्यास्ताच्या वेळी आकाशाचे सुंदर द़ृश्य, थंड वारा आणि चालताना दिसणारा प्रकाश यामुळे खराब मूडदेखील सुधारू शकतो. सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाण्याने मानसिक शांती मिळेल ज्यामुळे ताण जाणवणार नाही आणि जेव्हा मन शांत असेल तेव्हा झोपही चांगली होईल.
रात्रीच्या जेवणापूर्वी थोडे फिरायला गेल्याने पचनसंस्था निरोगी राहते. म्हणूनच संध्याकाळी जेवणानंतर फिरायला जाण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी जेवणापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाऊ शकता. याशिवाय, शरीरासोबतच मानसिक आरोग्यही चांगले राहते. फिरायला जाण्याने शरीरात ऊर्जा वाढते, त्यामुळे कोणतेही काम करण्यास आळस वाटत नाही.
निसर्ग हा सर्वात चांगला मित्र असतो. त्याच्या जवळ गेल्याने, तुमची सर्व नकारात्मकता नाहीशी होते आणि तुम्ही गोष्टींबद्दल चांगल्या पद्धतीने विचार करू शकता आणि मन देखील जलद काम करते ज्यामुळे सर्जनशीलता वाढते, याचा यात उल्लेख आहे.