लसणामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल, अँटिव्हायरल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यात ‘एलिसिन’ नावाचे एक सक्रिय घटक असते, जे त्याच्या अनेक औषधी गुणधर्मांसाठी जबाबदार आहे.
हृदयाचे आरोग्य : लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी होतो आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : लसणामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर संसर्गजन्य आजारांशी लढण्यास मदत होते.
पचन सुधारते : लसूण पचनसंस्थेला चालना देतो आणि गॅस, अपचन, अॅसिडिटी यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतो.
रक्त शुद्धीकरण : लसूण रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो आणि रक्त शुद्ध ठेवतो.
कर्करोगाचा प्रतिबंध : काही अभ्यासानुसार, लसूण फुफ्फुस, कोलन आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो.
मधुमेहात फायदेशीर : लसूण रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवून साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो.
सूज कमी करणे : लसणामध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
कच्चा लसूण : सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या एक-दोन पाकळ्या खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. कारण, यामुळे ‘एलिसिन’चे प्रमाण सर्वाधिक मिळते.
भाजलेला लसूण : तुपात किंवा तेलात भाजून लसूण खाल्ल्याने त्याची चव सुधारते आणि काही औषधी गुणधर्म टिकून राहतात.
पदार्थांमध्ये वापर : भाजी, आमटी, चटणी आणि इतर अनेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो, ज्यामुळे पदार्थाला चव येते आणि आरोग्याचे फायदेही मिळतात.
तोंडाची दुर्गंधी : लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला तीव्र वास येऊ शकतो.
पोटाचे विकार : जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, छातीत जळजळ किंवा अतिसाराचा त्रास होऊ शकतो.
यकृतावर परिणाम : काही अहवालानुसार, कच्च्या लसणाचे अतिसेवन यकृतासाठी हानिकारक ठरू शकते.
रक्त पातळ होणे : लसूण रक्त पातळ करतो, त्यामुळे रक्त गोठण्यास मदत करणार्या औषधे घेणार्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शस्त्रक्रियेपूर्वीही लसूण सेवन टाळावे.
निम्न रक्तदाब : ज्यांचा रक्तदाब कमी आहे, त्यांनी लसूण खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी. कारण, तो रक्तदाब आणखी कमी करू शकतो.