नवी दिल्ली : ‘हळद लावून पिवळा केला, बाशिंग बांधून नवरा केला’ वगैरे म्हणी आपल्याला हळद आणि पिवळ्या रंगाचे अद्वैतच दाखवत असते. मात्र, हळद ही पिवळीच असेल असे नाही, हे आता दिसून येत आहे. पारंपरिक पिवळ्या हळदीबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे. परंतु, सध्या बाजारपेठेत आणि शेती क्षेत्रात ‘निळी हळद’ चर्चेचा विषय ठरत आहे. दिसायला आतून गडद निळी किंवा जांभळी असणारी ही हळद केवळ दुर्मीळच नाही, तर आरोग्यासाठी ‘संजीवनी’ मानली जात आहे. यामुळेच या हळदीला बाजारात प्रतिकिलो 500 ते 2,000 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
निळ्या हळदीला वैज्ञानिक भाषेत ‘कर्कुमा कॅसिया’ (Curcuma Caesia) असे म्हणतात. या हळदीची पाने आणि कंद सामान्य हळदीसारखेच दिसतात. मात्र, कंदाचा काप घेतल्यावर तो निळसर-जांभळा दिसतो. ही प्रामुख्याने ईशान्य भारतात आढळणारी वनस्पती आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर लावली जात आहे. निळ्या हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’चे प्रमाण खूप जास्त असते. तसेच, यात अँटी-ऑक्सिडंटस् आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात.
कर्करोगावर प्रभावी : कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी ही हळद गुणकारी मानली जाते. श्वसनाचे विकार : अस्थमा आणि जुनाट खोकल्यावर औषध म्हणून याचा वापर होतो.
त्वचारोग : जखमा भरणे आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी ही हळद अत्यंत प्रभावी आहे.
सांधेदुखी : हाडांच्या दुखण्यावर आणि सूज कमी करण्यासाठी याचा लेप लावला जातो. निळ्या हळदीला इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते. तसेच, यावर रोगराईचा प्रादुर्भावही कमी असतो.
2. बाजारभाव : सामान्य हळद जिथे 80-100 रुपये किलोने विकली जाते, तिथे निळी हळद 500 रुपयांपासून पुढे विकली जाते. वाळवलेली निळी हळद तर अधिक महाग असते.
3. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन : एक एकर शेतीतूनही शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात.