लंडन ः प्रसिद्ध दिवंगत भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पाच दशकांपूर्वी अशी संकल्पना मांडली होती की, बिग बँगच्या वेळी संपूर्ण ब—ह्मांड सूक्ष्म कृष्णविवरांनी भरले गेले असावे. आता वैज्ञानिकांना असे संकेत मिळाले आहेत की, अशा एका सूक्ष्म कृष्णविवराचा स्फोट प्रत्यक्ष घडला असावा. फेब—ुवारी 2025 मध्ये, युरोपियन संशोधन संस्था KM3 NeT (जी फ—ान्स, इटली आणि ग्रीसच्या किनार्यावरील समुद्राच्या तळाशी असलेल्या डिटेक्टरसह कार्यरत आहे) यांनी अत्यंत प्रबळ न्युट्रिनो कणाच्या शोधाची घोषणा केली. या रहस्यमय कणाची ऊर्जा सुमारे 100 PeV इतकी होती, जी जगातील सर्वात शक्तिशाली ’लार्ज हेड्रॉन कॉलिडर’मध्ये निर्माण होणार्या कणांपेक्षा 25 पट जास्त आहे.
हा न्युट्रिनो इतका ऊर्जायुक्त का आहे, याचे उत्तर वैज्ञानिकांना सापडत नव्हते. मात्र, नवीन संशोधनात एका वेगळ्या शक्यतेचा अंदाज मांडण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, हा न्युट्रिनो एका बाष्पीभूत होणार्या कृष्णविवराचेच चिन्ह असू शकतो! हे संशोधन अद्याप arXiv डेटाबेसवर प्रकाशित झाले असून त्याचे समकक्ष पुनरावलोकन ( peer review) बाकी आहे. 1970 च्या दशकात स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरांबद्दल एक क्रांतिकारी संकल्पना मांडली. त्यांनी सांगितले की कृष्णविवरे संपूर्णतः काळी नसतात. क्वांटम क्षेत्र आणि कृष्णविवराचा घटना क्षितिज यामधील गुंतागुंतीच्या परस्परसंवादामुळे, कृष्णविवर हळूहळू विकिरण उत्सर्जित करते, ज्याला हॉकिंग रेडिएशन म्हटले जाते. ही प्रक्रिया चालू राहिल्यास, कृष्णविवर हळूहळू बाष्पीभूत होते आणि शेवटी उच्च-ऊर्जायुक्त कण व विकिरणांच्या वादळासारख्या स्फोटात नष्ट होते.
KM3 NeT ने शोधलेला न्युट्रिनो हा अशाच एका स्फोटाचा पुरावा असू शकतो! सध्या ज्ञात असलेली सर्व कृष्णविवरे कमीत कमी सूर्याच्या दुप्पट वस्तुमानाइतकी मोठी असतात आणि ती नष्ट होण्यासाठी 10भ100 वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल. त्यामुळे KM3 NeT ने शोधलेले न्युट्रिनो एखाद्या स्फोट झालेल्या कृष्णविवरामुळे निर्माण झाला असेल, तर ते कृष्णविवर अत्यंत छोटे असले पाहिजे ड्ढ फक्त 10,000 किलोग्रॅम (सुमारे दोन प्रौढ आफि—कन हत्तींच्या वजनाइतके)! अशा सूक्ष्म कृष्णविवरांचे निर्माण कसे झाले असावे? याचे एकमेव संभाव्य उत्तर म्हणजे बिग बँगच्या गोंधळात निर्माण झालेले प्रारंभिक कृष्णविवरे. बिग बँगनंतर तयार झालेली सर्वात छोटी कृष्णविवरे आजपर्यंत नष्ट झाली असतील, मात्र काही मोठी कृष्णविवरे अजूनही अस्तित्वात असू शकतात. जर KM3 NeT ने शोधलेला न्युट्रिनो प्रत्यक्षात एका बाष्पीभूत होत असलेल्या कृष्णविवराचा पुरावा असेल, तर हॉकिंग यांच्या सिध्दांताला प्रथमच प्रत्यक्ष पुरावा मिळू शकतो. हे संपूर्ण ब—ह्मांडशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि कृष्णविवरांच्या अभ्यासाला नवे दालन खुले करेल!