Hardik Pandya Rudra Watch 
विश्वसंचार

Hardik Pandya Rudra Watch : हार्दिक पंड्याचे शिव प्रतिमा असलेले घड्याळ चर्चेत; किंमत ऐकून थक्क व्हाल

किंमत पाक कर्णधाराच्या पगारापेक्षा तिप्पट जास्त

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः टीम इंडियाने ‌‘टी-20 वर्ल्ड कप 2026‌’मध्ये महाशिवरात्रीला पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला खरा; पण या विजयासोबतच सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगतेय ती अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्या मनगटावरील एका खास घड्याळाची. ही केवळ एक चैनीची वस्तू नसून हार्दिकची ‌‘महादेवा‌’प्रती असलेली श्रद्धा दर्शवणारी एक दुर्मीळ कलाकृती आहे.

ज्या दिवशी हा सामना झाला, त्या दिवशी महाशिवरात्रीचे पावन पर्व होते. या खास मुहूर्तावर हार्दिक पंड्याने आपल्या निळ्या जर्सीला साजेसे ‌'Jacob & Co Epic X Sport Rudra Edition' हे जगातील अत्यंत महागड्या घड्याळांपैकी एक परिधान केले होते. या घड्याळाची खास वैशिष्ट्ये : त्रिशूळ आणि डमरू : घड्याळाचे काटे भगवान शिवाच्या त्रिशूळ आणि डमरूपासून प्रेरित आहेत. ‌‘ओम‌’चे चिन्ह : घड्याळाच्या डायलवर अत्यंत सुंदररीत्या ‌‘ॐ‌’ कोरण्यात आला आहे. रुद्राक्ष डिझाईन : यात रुद्राक्षाचे दाणे आणि शिवशंकराच्या ‌‘रुद्र‌’ अवताराची झलक पाहायला मिळते.

अत्यंत दुर्मीळ : हे घड्याळ इतके खास आहे की, जगभरात याचे केवळ 25 नमुने तयार करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर सध्या या घड्याळाच्या किमतीची तुलना पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्या पगाराशी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या घड्याळाची किंमत सुमारे 28,000 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 25.35 लाख रुपये आहे. ही किंमत पाकिस्तानच्या कर्णधाराच्या महिन्याच्या पगारापेक्षा सुमारे तिप्पट जास्त आहे. म्हणजेच, पाकिस्तानच्या कर्णधाराची महिनाभराची जेवढी कमाई नाही, त्यापेक्षा जास्त किमतीचे घड्याळ हार्दिक आपल्या मनगटावर बांधतो. केवळ महागड्या फॅशनमुळेच नव्हे, तर हार्दिकने आपल्या अष्टपैलू खेळानेही चाहत्यांची मने जिंकली. पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात 61 धावांनी मिळवलेल्या विजयात हार्दिकने मोलाची भूमिका बजावली. या विजयामुळे भारताने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT