पेरू फळही मेंदूसाठी गुणकारी असते.  Pudhari File Photo
विश्वसंचार

मेंदूच्या आरोग्यासाठी पेरू ठरतो गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मेंदूच्या आरोग्यासाठी साल्मन, टुनासारखे चरबीयुक्त मासे किंवा अक्रोडसारखा सुका मेवा गुणकारी ठरतो याची माहिती अनेकांना असेल. या दोन्हीमध्ये ओमेगा-थ्री फॅटी अ‍ॅसिड असते व त्याचा मेंदूच्या आरोग्याला चांगला लाभ होत असतो. मात्र पेरूसारखे फळही मेंदूसाठी गुणकारी असते याची अनेकांना कल्पना नसते. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे पेरूमध्ये आढळतात. त्यात व्हिटॅमिन बी 3 आणि व्हिटॅमिन बी 6 असते जे मेंदूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात आणि तुमच्या मज्जातंतूंना आराम देतात.

पेरूमध्ये कॉपर असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते. हे आपल्या थायरॉईड ग्रंथीला चांगले कार्य करण्यास मदत करते. पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. अँटीऑक्सिडंट्समुळे ते फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासून सुरक्षित राहतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू हे उत्तम फळ ठरू शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे दोन्ही गुणधर्म आवश्यक आहेत.पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात. जेणेकरून आपण तरुण दिसू लागतो. पेरू खाल्ल्याने वृद्धत्व चेहर्‍यावर लवकर दिसत नाही. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खूप फायदेशीर ठरतो. कारण त्यात फायबर असते ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जरी हे जीवनसत्त्व जास्त नसले तरी ते तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन सी यामध्ये आढळते, ते तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT