विश्वसंचार

फुलांनी नव्हे, चिप्सच्या पाकिटांनी सजवली नवरदेवाची कार!

Arun Patil

नवी दिल्ली : लग्नात नवरदेवाची कार सजवणे ही एक महत्त्वाची बाब असते. रंगीबेरंगी फुलांनी अशी कार सुंदररीत्या सजवली जाते. मात्र, एका लग्नात नवरदेवाची कार फुलांनी नव्हे, तर चिप्सच्या रंगीबेरंगी पाकिटांनी सजवण्यात आली! त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सतपाल यादव नावाच्या यूझरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये नवरदेव एका कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याची ही कार चक्क चिप्सच्या विविधरंगी पाकिटांनी सजवलेली दिसत आहे. या व्हिडीओला 1.7 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. तसेच यूझर्स यावर अनेक भन्नाट प्रतिक्रियाही नोंदवत आहेत. अनेक लोक या सजावटीला 'युनिक आयडिया' म्हणत आहेत, तर काहींना नवरदेवाने असे का केले, असा प्रश्न पडला आहे!

हल्ली आपला लग्नसोहळा 'हट के' करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकार करीत असतात. अशा इच्छेतूनच हे करण्यात आले असावे, असा अनेकांचा अंदाज आहे. मात्र, या प्रकाराने नवरदेवाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले, हे मात्र नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT