File Photo
विश्वसंचार

‘लिंक्डइन प्रोफाईल’ असलेल्या श्वानाची कंपनी ‘गुगल’ घेणार

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून मीका आर नावाची एक श्वान मादी चर्चेत आहे. त्याचं कारण तिचे ‘लिंक्डइन’ प्रोफाइल आहे. प्रोफाइलमध्ये या श्वानाला ‘चीफ डॉग ऑफिसर’ म्हटलं आहे. या श्वानाचा मालक अस्साफ रॅपापोर्टची कंपनी ‘विझ’ने गुगलसोबत एक मोठी डील केली आहे. गुगल आता ‘विझ’ला 32 अब्ज डॉलरला विकत घेणार आहे; मात्र हे सगळं पाहण्यासाठी आता मीका आर जिवंत नाही. अस्साफ रैपापोर्ट कंपनीचे सीईओ आणि को-फाऊंडर असताना, त्यानं त्याची श्वान ‘विझ’ची ‘चीफ डॉग ऑफिसर’ म्हणून नियुक्त केली होती. गुगल आणि ‘विझ’च्या डीलनंतर मीका आरचं लिंक्डइन प्रोफाइल आता चर्चेत आलं आहे.

‘विझ’ एक आयटी सिक्युरिटी कंपनी आहे. ती क्लाऊड सिक्युरिटी संबंधित सिक्युरिटी प्रदान करते. फक्त पाच वर्षांत ‘विझ’ने मोठ्या कंपन्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. गुगल गेल्या वर्षीपासून ‘विझ’ला विकत घेण्याचा विचार करत होती, पण कंपनीच्या बोर्डनं सुरुवातीला त्यासाठी नकार दिला होता. आता गुगलनं 32 अब्ज डॉलरमध्ये डील केली आहे. ‘विझ’ची स्थापना 2020 मध्ये अस्साफ रॅपापोर्ट आणि त्याच्या इस्रायल सहकार्‍यांनी केली. तेव्हा मीका आर जिवंत होती आणि कंपनीमध्ये तिचं महत्त्व होतं. तिचं लिंक्डइन प्रोफाइल तयार करून तिला ‘चीफ डॉग ऑफिसर’ बनवण्यात आलं होतं. मीका कंपनीच्या मालकांबरोबर प्रवास करायची.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT