Vertical tabs feature | ‘गुगल क्रोम’मध्ये आले खास ‘व्हर्टिकल टॅब्स’ फीचर 
विश्वसंचार

Vertical tabs feature | ‘गुगल क्रोम’मध्ये आले खास ‘व्हर्टिकल टॅब्स’ फीचर

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः इंटरनेटवर काम करताना एकामागून एक अनेक टॅब्स उघडण्याची आपल्याला सवय असते; पण एकाच वेळी अनेक टॅब्स ओपन केल्यामुळे स्क्रीनवर जो गोंधळ उडतो, त्यामुळे कामाचा वेग मंदावतो. युजर्सची हीच अडचण ओळखून आता ‘गुगल क्रोम’ने एक धमाकेदार अपडेट आणले आहे. गुगलने क्रोममध्ये ‘व्हर्टिकल टॅब्स’ आणि एक नवीन ‘रीडिंग मोड’ सादर केला आहे.

आतापर्यंत क्रोममध्ये सर्व टॅब्स स्क्रीनच्या वरच्या बाजूला आडव्या पट्टीमध्ये दिसत असत. टॅब्सची संख्या वाढली की वेबसाईटचे नाव वाचणे कठीण व्हायचे. पण नवीन अपडेटनंतर तुम्ही हे टॅब्स स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला शिफ्ट करू शकाल. व्हर्टिकल टॅब्समुळे वेबसाईटचे पूर्ण नाव आणि टायटल वाचणे सोपे होईल. टॅब्सचे गट (Groups) बनवणे आणि ते हाताळणे अधिक सुलभ होईल. एकदा हे फीचर इनेबल केले की, जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही तोपर्यंत ते ‘डिफॉल्ट’ राहील. व्हर्टिकल टॅब्ससोबतच गुगलने आपला ‘रीडिंग मोड’देखील रिफ्रेश केला आहे. आता हा मोड ‘फुल-पेज इंटरफेस’मध्ये उपलब्ध असेल.

यामुळे जाहिराती आणि अनावश्यक पॉप-अप्स हटवून तुम्हाला केवळ मजकूर वाचण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. गुगलच्या माहितीनुसार, युजर्स कधीही कोणत्याही क्रोम टॅबवर राईट क्लिक करून ‘Show Tabs Vertically’ हा पर्याय निवडून हे फीचर सक्रिय करू शकतात. टॅब उघडण्यासाठी कोणतीही नवीन मर्यादा नाही; हे पूर्णपणे तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअर परफॉर्मन्सवर अवलंबून असेल. टेक तज्ज्ञांच्या मते, इतर ब्राऊझर्सकडून मिळणारी स्पर्धा पाहता ‘गुगल क्रोम’ सातत्याने स्वतःला अपडेट करत आहे. यापूर्वी क्रोममध्ये एआय, स्प्लिट व्ह्यू आणि ऑटोफिल यासारखे अपडेटस् आले आहेत. व्हर्टिकल टॅब्स आणि नवीन रीडिंग मोड फीचर हळूहळू जगभरातील सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT