Mosquito Control 
विश्वसंचार

गुगलचा अजब प्रयोग! डासांपासून पसरणारे आजार रोखण्यासाठी 'बॅक्टेरिया' अस्त्र; अशी आहे अनोखी मोहीम

Mosquito Control : प्रयोगशाळेतील संक्रमित डासांमुळे घटणार डासांची संख्या

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः डास हा उपद्रवी कीटक निसर्गाने का बनवला असावा, याचा सर्वांनाच प्रश्न पडतो. एक तर तो चावून बेजार करतो, कानाभोवती कर्कश आवाजात गुणगुण करतो आणि चाव्याने मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे घातक आजारही फैलावतो! या डासांचा नायनाट करण्यासाठी माणूस अनेक प्रयत्न करीत आलेला आहे. आता या डासांची काही खैर नाही. कारण, त्यांचा खात्मा करण्याचा जणू विडाच गुगलनं उचलला आहे. विशेष प्रयोगशाळेत ठेवण्यात आलेल्या 3.2 कोटी डासांना गुगल लवकरच मोकळं सोडणार आहे. ज्यामुळं पुढं जे काही घडेल त्यावरच आता संशोधकांचं लक्ष आहे.

2014 पासून या प्रयोगावर गुगलचं अध्ययन सुरू असून, ऊशर्लीस असं त्यांच्या मोहिमेचं नाव आहे. फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियाच्या प्रयोगशाळेत या धर्तीवर काम सुरू असून त्याअंतर्गत 3.2 कोटी मच्छर पाळण्यात आले आहेत, ज्यांचा वापर डासांपासून पसरणाऱ्या आजारांना रोखण्यासाठीच केला जाणार आहे. या प्रयोगासाठी गुगलच्या संशोधकांनी एक खास आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत त्यांनी प्रयोगशाळांतील नर डासांना थेश्रलरलहळर ळिळिशपींळी नामक बॅक्टेरियानं संक्रमित केलं जाणार आहे. हे संक्रमित नर डास मादी डासांच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून तयार होणारी अंडी फुटणारच नाहीत आणि हळूहळू जगातील डासांची संख्या कमी होत जाईल.

काही अहवालांनुसार दोन टप्प्यांमध्ये हा प्रयोग केला जाणार असून, पहिल्या वर्षात फ्लोरिडाच्या प्रोगशाळेतील 1.6 कोटी डास सोडले जातील आणि दुसऱ्या वर्षात 1.6 कोटी डास सोडले जातील. या प्रयोगाच्या धर्तीवर संशोधक करत असणाऱ्या दाव्यानुसार मनुष्याला मादा डासच चावतात आणि त्यातूनच आजारी पसरतात. त्यामुळं नर डास सोडले, तर डासांची संख्या कमी होईल. कारण असेल न फुटणारी अंडी. या एकंदर प्रयोगाचे संभाव्य निष्कर्ष पाहता येत्या काळात पृथ्वीवरून डास नष्टच होतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 2025 च्या डिसेंबर महिन्यात गुगलनं संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण संस्थेकडे डासांसंदर्भातील या प्रयोगासंदर्भातील परवानगी मागणारा अर्ज करण्यात आला होता, ज्यावर अद्यापही विचारविनिमय सुरू असून, हे परीक्षण नेमकं कधी आणि कुठं केलं जाईल याची माहिती मात्र समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळं अमेरिकी सरकारसुद्धा पेचात असून यावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT