Poland Treasure | पोलंडच्या जंगलात सापडला सोन्याचा खजिना  Pudhari File Photo
विश्वसंचार

Poland Treasure | पोलंडच्या जंगलात सापडला सोन्याचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

लंडन : पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक वेळा काही हौशी मेटल डिटेक्टरिस्ट यंत्राच्या सहाय्याने जमिनीत दडलेला प्राचीन खजिना उघड करीत असतात. काही वेळा असा खजिना अपघातानेही सापडत असतो. आता पोलंडमधील कालिस्ज शहराजवळच्या ग्रोडजिएक जंगलात हौशी लोकांच्या एका गटाला खजिना शोधताना सोन्याचा हार, रोमन काळातील योद्ध्याची कबर आणि 11 व्या शतकातील नाण्यांनी भरलेले मातीचे मडके सापडले. डेनार कालिस्ज नावाच्या ग्रुपला या ऐतिहासिक वस्तू केवळ पाच आठवड्यांच्या शोधात मिळाल्या. ही शोध मोहीम जून महिन्यात सुरू झाली आणि 12 जुलै रोजी सोन्याचा हार मिळाल्याने या शोधाला मोठे यश मिळाले.

डेनार कालिस्ज नावाचा एक ग्रुप आहे, ज्याला जुन्या वस्तू शोधण्याचा छंद आहे. या ग्रुपने केवळ पाच आठवड्यांत अनेक जुन्या वस्तू शोधून काढल्या. यात पाचव्या शतकातील सोन्याचा हार विशेष आहे, जो खूप सुंदर आणि मौल्यवान आहे. जून महिन्यात या शोधाला सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांना रोमन काळातील एक जुनी कबर मिळाली. या कबरीत एका योद्ध्याचे अवशेष होते, ज्याच्यासोबत भाला आणि ढालीचा काही भाग होता.

या वस्तू त्यावेळच्या युद्धाच्या पद्धती दर्शवतात. काही दिवसांनंतर त्यांना 11 व्या शतकातील एक नाणे आणि एक छोटे मातीचे भांडे सापडले. जेव्हा हे भांडे कालिस्ज विद्यापीठात उघडण्यात आला, तेव्हा त्यात 631 नाणी सापडली. हे पाहून सगळेच थक्क झाले की, एक नाणे इतक्या मोठ्या खजिन्याकडे निर्देश करत आहे. 12 जुलै रोजी ग्रुपमधील सदस्य मातेऊज याला सोन्याचा एक तुकडा सापडला. त्यांना ती बांगडी असल्याचे वाटले.

पण तपास केल्यावर कळले की तो पाचव्या शतकातील सोन्याचा हार आहे. 222 ग्रॅम वजनाचा हा हार शुद्ध सोन्याचा आहे आणि तो वाकवून घड्यामध्ये ठेवण्यात आला होता. या डिझाईनमध्ये हुक आणि लूप आहेत आणि तो खूप चांगल्या स्थितीत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा हार गॉथिक लोकांचा आहे, जे त्या काळात पोलंडच्या काही भागांमध्ये राहात होते. हा हार आता कालिस्जच्या म्युझियममध्ये ठेवला जाईल, जिथे लोक तो पाहू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT