विश्वसंचार

उत्खननात सापडला सोन्याचा खजिना

Arun Patil

मेक्सिको : खोदकाम करत असताना कुठे, कोणता खजिना केव्हा हातास येईल, काहीही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर याबाबत असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात काही लोक दगड फोडून बाजूला करत असताना त्यातून कसा सोन्याचा खजिना सापडला, हे दिसून येते आहे.

आता असे खजिने प्रत्येकालाच सापडत नाहीत; पण ज्यांना सापडतात, त्यांच्यासाठी जणू ही लॉटरीच असते. जगभरात काही ठिकाणे अशीही आहेत की, तिथे थोडेफार खोदल्यानंतर काही ना काही मौल्यवान वस्तू हमखास सापडते.

अशाच एका ठिकाणी काही लोकांना डोंगराचे उत्खनन सुरू असताना एक अनोखी वस्तू सापडली आणि ती स्वच्छ केल्यानंतर ते चक्क सोने असल्याचे आढळून आल्याने त्या सर्वांनाच धक्का बसला. आता ही वस्तू चिखलात होती. पण, चिखल काढत असताना दगड सापडला आणि त्या दगडाखाली हा सोन्याचा खजिना होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक दगड फोडताना दिसत आहेत. ते आधी खडकाचे तुकडे करतात आणि नंतर खाली खोदण्यास सुरुवात करतात. त्यानंतर त्यात सापडलेले हे तुकडे प्लास्टिकच्या चाळणीत ठेवतात आणि ते स्वच्छ केल्यानंतर त्यातून चमकदार सोने दिसून येते.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'फिश न गोल्ड' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत 1.6 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर लाखो जणांनी लाईकही केला आहे.

SCROLL FOR NEXT