File Photo
विश्वसंचार

‘या’ ज्वालामुखीतून बाहेर पडते सोन्याची धूळ

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : जगभरात अनेक वेळा ‘गोल्ड रश’ पाहायला मिळत असते. सोन्याच्या खाणीमधून सोने बाहेर काढले जात असते हे आपल्याला माहिती आहेच; पण अन्यही काही मार्गांनी नैसर्गिकरीत्याच सोने मिळत असते. अगदी नद्यांच्या प्रवाहातही सोन्याचे कण सापडत असतात. आपल्याकडे झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशातून वाहणार्‍या ‘स्वर्णरेखा’ नावाच्या नदीतही असेच सोन्याचे कण आढळतात. अंटार्क्टिकामध्येही असेच एक ठिकाण आहे. ‘आयएफएल सायन्स’च्या अहवालानुसार, अंटार्क्टिकामध्ये माऊंट एरेबस नावाचा एक सक्रिय ज्वालामुखी पर्वत आहे. या ज्वालामुखीतून दररोज सोन्याची धूळ बाहेर पडते, ज्याची किंमत सहा हजार डॉलर्स म्हणजे सुमारे पाच जवळ असू शकते. पण, येथे पोहोचणे शक्य नाही, कारण माऊंट एरेबस अंटार्क्टिकामध्ये असलेल्या 138 सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा ज्वालामुखी दररोज सुमारे 80 ग्रॅम स्फटिकीकृत सोने असलेला वायू बाहेर टाकतो, ज्याची धूळ 12,448 फूट उंचीवरून उडते. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या माहितीनुसार हा ज्वालामुखी नियमित वायू आणि वाफ उत्सर्जित करतो व कधीकधी खडक देखील बाहेर टाकतो. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील लॅमोंट-डोहर्टी अर्थ वेधशाळेचे कॉनर बेकन यांनी लाईव्ह सायन्सला सांगितले की, 1972 पासून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असून, लाखो वर्षांपासून सक्रिय असल्याचेही मानले जाते. 1841 मध्ये माऊंट एरेबसचा शोध लागला. या पर्वताचे नाव कॅप्टन जेम्स क्लार्क रॉस यांनी त्यांच्या एरेबस जहाजाच्या नावावरून ठेवले होते. कॅप्टन जेम्स एक संशोधक होते आणि त्यांच्या अंटार्क्टिक मोहिमेवर होते. आतापर्यंत अनेक लोकांनी आतापर्यंत या पर्वतावर चढाई केली आहे; पण त्यापैकी कोणीही ज्वालामुखीपर्यंत पोहोचू शकलेलं नाही. कारण, असं करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT