बकरी व कोकराने केला आत्महत्येचा प्रयत्न! Pudhari File Photo
विश्वसंचार

बकरी व कोकराने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न!

जळत्या चिमणीत जाणुनबुजून उडी मारताना व्हिडीओ

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जर तुम्हाला असं वाटतं की, फक्त माणूसच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो, तर तुम्ही चुकीचे आहात. माणसंच नाही, तर पशुपक्षी सुद्धा तणावाखाली असताना आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. काही पक्षी आकाशातून वेगाने जमिनीवर येऊन आत्महत्या करतात. आपल्याच देशात आसाममधील जतिंगा व्हॅलीमध्ये असा प्रकार पाहायला मिळतो. स्कॉटलंडमधील ओव्हरटन ब्रीज नावाच्या पुलावरून खाली 50 फूट खोल दरीत उडी मारून अनेक कुत्र्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर लोकांच लक्ष वेधून घेतोय. त्यात एक बकरी जळत्या चिमणीत जाणुनबुजून उडी मारताना दिसतेय. हा व्हिडीओ हैराण करणारा आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हाडं गोठवणार्‍या थंडीपासून रक्षणासाठी घरच्यांनी चिमणी पेटवली आहे. खोलीत पाळलेली बकरी आहे, जी अचानक जळत्या चिमणीत उडी मारते. त्यावेळी घरातील एक सदस्य त्या बकरीचे पाय खेचून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण बकरी ऐकत नाही. पुन्हा एकदा जळत्या चिमणीकडे जाते. जणू आज जीवन संपवायचच, असंच त्या बकरीने ठरवलेलं दिसतय. बकरीला पाहून कोकरूसुद्धा त्या जळत्या चिमणीमध्ये उडी मारण्यासाठी पळतं, त्यावेळी मुलगा कसंबसं त्याला बाहेर काढतो. हा व्हिडीओ अनेक लोकाना थक्क करणारा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चार कोटींपेक्षा अधिक लोकांनी हा पाहिलाय. अनेकांनी ही भयानक क्लिप असल्याच म्हटलं आहे. हा काय प्रकार आहे हे समजले नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT