Glacier melting warning | हिमसाठे आताच वितळले उन्हाच्या लाहीचा गंभीर इशारा 
विश्वसंचार

Glacier melting warning | हिमसाठे आताच वितळले उन्हाच्या लाहीचा गंभीर इशारा

पुढारी वृत्तसेवा

मिसीसीपी : अमेरिकेच्या पश्चिम भागात यंदाचा मार्च महिना विक्रमी उष्ण ठरला असून, यामुळे आधीच कमी असलेला पर्वतीय हिमसाठा झपाट्याने वितळला आहे. उपग्रह चित्रांमधून या परिस्थितीचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. यामुळे येणारा उन्हाळा या भागासाठी अत्यंत चिंताजनक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साधारणपणे मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला हिमसाठा उच्चांक गाठतो; मात्र यंदा परिस्थिती उलटी असून हिमसाठा विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होणार असून, जंगलातील आगींचा धोका देखील वाढणार आहे. विशेषतः कोलोरॅडो नदी खोरे, जे आधीच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे, ते अधिक गंभीर संकटात सापडू शकते.

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे हिम वितळण्याची प्रक्रिया वेगाने वाढली. तापमान सरासरीपेक्षा तब्बल 30 अंशांनी जास्त नोंदवले गेले. यामुळे कोलोरॅडो रॉकी पर्वतरांगांमध्ये हिमसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. सामान्यतः एप्रिलमध्ये शिखर गाठणारा हिमसाठा यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उच्चांक गाठून नंतर घसरू लागला.

कॅलिफोर्नियामध्येही परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील हिमसाठ्याचे आरोग्य मोजणारा ‘स्नो वॉटर इक्विव्हॅलंट’ फक्त 22 टक्के इतकाच राहिला आहे. सिएरा नेवाडा पर्वतरांगांमध्ये हिमाच्छादन 1 मार्चला 52 टक्के होते, ते 24 मार्चपर्यंत 21 टक्केपर्यंत घसरले. या हिमसाठ्यावरच लाखो लोकांचे पाणी अवलंबून आहे. कोलोरॅडो नदी सुमारे 3.5 कोटी लोकांना, उद्योगांना आणि शेतीला पाणी पुरवते. मात्र हिमसाठा कमी झाल्यामुळे उन्हाळ्यात नद्यांमध्ये पाणी कमी होण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे हिवाळा ऋतूही जलद उष्ण होत आहे, ज्यामुळे भविष्यात हिमसाठा कमी होणे, लवकर वितळणे आणि पाणीटंचाई वाढणे हे अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT