Giraffe Research | जिराफ बुद्धिमान, त्‍यांना गणितही कळते! 
विश्वसंचार

Giraffe Research | जिराफ बुद्धिमान, त्‍यांना गणितही कळते!

पुढारी वृत्तसेवा

जोहान्सबर्ग : जिराफ हे केवळ त्यांच्या उंच गळ्यासाठीच नाही तर त्यांच्या बुद्धिमत्तेसाठीही यापुढे ओळखले जाऊ शकतात. स्पेनमधील बार्सिलोना प्राणी संग्रहालयात केलेल्या एका रंजक प्रयोगातून असे दिसून आले आहे की, जिराफ प्राथमिक दर्जाचे गणित (बेरीज) समजून घेण्यास सक्षम आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ लाइपझिग, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोना येथील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

या प्रयोगात संशोधकांनी चार जिराफांसमोर दोन पिवळे डबे ठेवले, त्‍यामध्‍ये गाजराचे तुकडे होते. त्यानंतर ते डबे बंद करून एका हिरव्या डब्यातील अतिरिक्त गाजराचे तुकडे एका बंद डब्यात टाकले गेले. जिराफांना एकूण संख्या न दाखवता त्यांना डबा निवडण्याची संधी दिली असता, सुमारे ६८ टक्‍के वेळा जिराफांनी जास्त गाजर असलेला डबा निवडला. यावरून जिराफ मनातल्या मनात बेरीज करत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. मात्र, वजाबाकीच्या प्रयोगात ते अपयशी ठरले.

शास्त्रज्ञांच्या मते, वन्यजीवनात जगण्यासाठी जिराफांना या गणितीय कौशल्याचा फायदा होतो. आफ्रिकेतील जंगलात बाभळीची झाडे खूप दूरवर पसरलेली असतात. कोणत्या भागात जास्त झाडे आणि पाने आहेत, याचा अंदाज लावून ते चरण्यासाठी जागा निवडतात. याशिवाय, जिराफ सतत बदलणाऱ्या गटांमध्ये राहत असल्याने त्यांना आपल्या सहकाऱ्यांची संख्या लक्षात ठेवणे गरजेचे असते. जिराफांशिवाय चिंपांझी, कोंबड्या आणि अस्वलांमध्येही अशी क्षमता आढळली आहे. तर, ट्युनिशियातील वाळवंटी मुंग्या भूमिती आणि त्रिकोणमितीचा वापर करून आपला मार्ग शोधतात, असेही या अभ्यासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT