विश्वसंचार

डायनासोरच्या आधी महाकाय मगरींचा होता दबदबा

Arun Patil

वॉशिंग्टन : कोट्यवधी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर वेगवेगळ्या प्रजातींच्या डायनासोरचेच साम्राज्य होते. एका लघुग्रहाच्या धडकेनंतर हे साम्राज्य उद्ध्वस्त झाले. डायनासोर पृथ्वीवर वावरण्यापूर्वी महाकाय मगरींचा सुळसुळाट होता, असे आता एका नव्या संशोधनातून आढळून आले आहे. संशोधकांनी प्रथमच 'एटोसॉर' नावाच्या या प्रजातीच्या शोधाची पुष्टी केली आहे. त्यांच्या शरीरावर अक्षरशः चिलखतासारखे मजबूत आवरण होते. त्यामुळे त्यांना आधुनिक काळातील मगरींचे चिलकतधारी भाऊबंद म्हटले गेले आहे.

हे प्राणी 20 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते. लुप्त होण्यापूर्वी ते वेगवेगळ्या आकारात आढळत होते. त्यांच्या कवचावर आता एक नवे संशोधन करण्यात आले आहे. या कवचाचे जीवाश्म आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळते, हे विशेष. यूटी जॅक्सन स्कूल ऑफ जियोसायन्सेजचे डॉक्टरेट विद्यार्थी विल्यम रेयेस यांनी याबाबतची माहिती दिली. मानेच्या मागील भागातील तसेच खांद्यापासून शेपटीच्या टोकापर्यंतच्या या कवचाचे अवशेष उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. ही एक नवी एटोसॉर प्रजाती असून तिला 'गारजापेल्टा म्युएलेरी' असे नाव देण्यात आले आहे. हे प्राणी आधुनिक काळातील मगरींसारखे दिसत होते.

वीस कोटी वर्षांपूर्वी त्यांचा पृथ्वीवर दबदबा होता. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'द अनाटोमिकल रेकॉर्ड' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांच्या हाडांची प्लेट थेट त्वचेत गेलेली होती आणि एखाद्या मोझॅकप्रमाणे या प्लेट्स एकमेकांमध्ये फिट होऊन कवचाचा एक सूट तयार करीत होती. त्याच्या शरीराच्या कडांवर काटे होते जे शिकार्‍यांपासून त्यांचे रक्षण करीत. एटोसॉरचे जीवाश्म अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया वगळता सर्व खंडांवर आढळलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT