Garba in New York | न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर गरब्याचा रंग! 
विश्वसंचार

Garba in New York | न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर गरब्याचा रंग!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : यंदा गरब्याचा रंग अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. या भव्य चौकात मोठमोठ्या जाहिरातींचे चमचमणारे स्क्रिन आणि पर्यटकांची गर्दी असते. तिथेच भारतीयांचा रंगीबेरंगी कपडे घालून गरबा रंगला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल झाला. परदेशातही भारतीयांचा ठेका पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनेक जण गोलाकार उभे राहून गरबा खेळताना दिसत आहेत. कुणी तालावर पावले टाकतेय, तर कुणी पारंपरिक पद्धतीने गोल फिरत नाचतेय. महिलांनी काळ्या रंगांची थीम निवडली आहे आणि घागरे रंगीबेरंगी आहेत. मागे टाईम्स स्क्वेअरचे मोठमोठे स्क्रिन आणि आजूबाजूला थांबून हा नजारा तेथील अमेरिकन लोक पाहताना दिसत आहेत. अमेरिकेच्या गजबजलेल्या चौकात काही वेळासाठी असे गुजराती गरब्याचा माहोल तयार झाला. हा गरबा पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला आहे. परदेशात राहूनही आपले सण, परंपरा आणि संस्कृती जपली जाते. हे पाहून काही जणांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. टाईम्स स्क्वेअरसारख्या जगप्रसिद्ध ठिकाणी भारतीय पारंपरिक गरबा सादर होत असल्यामुळे हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. गरबा हा गुजरातमधील पारंपरिक लोकनृत्याचा प्रकार आहे. नवरात्रीच्या काळात देवीची आराधना केली जाते व मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT