विश्वसंचार

खडूचा तुकडा, संगमरवराचा खडा, काडेपेटीतील काडीवरही गणेश!

Pudhari News

वडोदरा : श्रीगणेश केवळ विशिष्ट नाम आणि रूपापुरताच मर्यादित नसून तो परबह्म स्वरूपात संपूर्ण चराचराला व्यापून राहिलेला आहे. त्याचेच प्रतीक म्हणून वेगवेगळ्या माध्यमांतून गणेशाचा आविष्कार घडवला जात असतो. गुजरातच्या वडोदरा शहरातील कलाशिक्षक प्रजेश शाह यांनी तर ज्या ज्या वस्तूंवर गणेश प्रतिमा निर्माण केल्या आहेत ते पाहून कुणीही थक्‍क व्हावे! त्यांनी खडूचा तुकडा, संगमरवराचा छोटासा खडा, काडेपेटीतील काडीवरही गणेशाचे रूप दर्शवले आहे.

प्रजेश यांनी सांगितले की या सूक्ष्म कलाकृती असल्या तरी त्या पाहण्यासाठी भिंगाची गरज नाही. त्या सुस्पष्ट अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत. कुणीही सहजपणे या वस्तूंवरील बाप्पाचे दर्शन घेऊ शकते. प्रजेश यांनी बनवलेली ही चित्रे इतकी सुंदर आहेत की जणू काही तरी प्रिंट कम्प्युटराईज्ड केलेली असावीत असे एखाद्याला वाटू शकेल! खास गणेश चतुर्थीच्या सोहळ्यानिमित्त त्यांनी या कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. त्यांनी यासाठी चित्रेही काढली आहेत तसेच खडूवर कोरीवकामही केले आहे.

 

SCROLL FOR NEXT