विश्वसंचार

सुक्या मेव्याचा गणेश; विसर्जनानंतर कोरोना रुग्णांना वाटप

Pudhari News

सुरत : सध्याच्या कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्‍ती मजबूत असणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्यासाठी अक्रोड, काजू, बदामसारखा सुका मेवा तसेच शेंगदाण्यांसारखे 'नटस्'ही उपयुक्‍त आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये सुरतच्या डॉ. आदिती मित्तल यांनी सुका मेवा व भुईमुगाच्या शेंगांचा वापर करून गणेशमूर्ती बनवली आहे. विसर्जनानंतर हा सुका मेवा व शेंगदाणे 'कोविड-19' च्या रुग्णांना देण्यात येणार आहे.

आदिती यांनी ही मूर्ती बनवण्यासाठी अक्रोड, काजू, बदाम यांचा वापर केला असून मूर्ती 20 इंच उंचीची आहे. मूर्तीचा पोटाचा व बहुतांश भाग हा अक्रोडाचा आहे. डोळे काजूपासून बनवले असून कान भुईमुगाच्या शेंगांनी बनवले आहेत. आदिती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या मूर्तीचे फोटो शेअर केले आहेत. ही मूर्ती गणेश चतुर्थीला सुरतच्या 'अटल संवेदना' या कोविड हॉस्पिटलमध्ये स्थापित करण्यात आली. एकूण 511 ड्राय फ्रुटस्चा वापर यासाठी केला गेला आहे. विसर्जनानंतर यामधील सुका मेवा प्रसाद रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्याचे साधन म्हणून रुग्णांना दिला जाईल. आदिती यांची ही संकल्पना आणि कौशल्य पाहून अनेकांनी त्यांचे सोशल मीडियातून कौतुक केले आहे.

SCROLL FOR NEXT