Frog-like Robot | बेडकासारखा उड्या मारणारा अन् पोहणारा छोटा रोबो  
विश्वसंचार

Frog-like Robot | बेडकासारखा उड्या मारणारा अन् पोहणारा छोटा रोबो

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आतापर्यंत श्वान, सर्प, झुरळ, ससा अशा वेगवेगळ्या रूपांतील रोबो वेगवेगळ्या कामांसाठी विकसित करण्यात आलेले आहेत. आता रोबोटिक्स क्षेत्रातील तंत्रज्ञांनी एका अत्यंत लहान, सूक्ष्म रोबोची निर्मिती केली आहे, जो हुबेहूब बेडकासारखा काम करतो. हा चिमुकला रोबो केवळ ओलसर पृष्ठभागावर उड्या मारून पुढे जाऊ शकत नाही, तर पाण्यामध्ये उत्तम प्रकारे पोहूही शकतो. नैसर्गिक प्राण्यांच्या हालचालींपासून प्रेरणा घेऊन बनवलेल्या या सूक्ष्म रोबोमुळे भविष्यातील शोध आणि बचाव मोहिमांमध्ये मोठी क्रांती घडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या लहान रोबोची रचना जैविक बेडकाच्या स्नायू आणि हाडांच्या रचनेचा सखोल अभ्यास करून करण्यात आली आहे. अत्यंत हलक्या आणि टणक पदार्थांपासून बनवलेला हा रोबो जमिनीवर किंवा पाण्याच्या काठावर जिथे इतर यंत्रे घसरतात, अशा ओलसर आणि चिखलमय भागात सहजपणे उड्या मारत मार्गक्रमण करतो. पाण्याचा अडथळा आल्यास तो लगेच आपल्या पायांची हालचाल बदलून पाण्यात पोहण्यास सुरुवात करतो.

संशोधकांनी सांगितले की, या रोबोचा आकार अत्यंत सूक्ष्म असल्याने तो मानवाला पोहोचणे कठीण असलेल्या अत्यंत अरुंद आणि कठीण जागांमध्ये सहज प्रवेश करू शकतो. पूर, भूकंप किंवा चिखल साचलेल्या आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या लोकांचा शोध घेणे, तसेच पर्यावरणीय निरीक्षणासाठी जलाशयांमधील पाळत ठेवणे यासारख्या कामांसाठी हा रोबो अत्यंत फायदेशीर ठरेल. बेडकाच्या नैसर्गिक कौशल्याची नक्कल करणारा हा रोबो ‘सॉफ्ट रोबोटिकस्‌’ आणि सूक्ष्म तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT