विश्वसंचार

डायनासोरच्या काळातील बेडकाचे जीवाश्म

Arun Patil

बीजिंग : चीनमध्ये तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीच्या एका बेडकाचे जीवाश्म शोधण्यात आले आहे. डायनासोरच्या काळातील या बेडकाच्या पोटात अंडीही असल्याचे आढळून आले. अशा प्रकारचा हा सर्वात प्राचीन बेडूक ठरला आहे. या मादी बेडकाचा मृत्यू प्रजनन क्रियेवेळी झाला असावा असे संशोधकांना वाटते.

मादी बेडकाच्या शरीरात अंड्यांची एक थैली विकसित होत असते. मादी अंडी घालते आणि नर बेडूक ही अंडी फलित करतात. आता डायनासोरच्या काळातील जी मादी बेडूक आढळली आहे ती पोटातच अंडी असलेल्या स्थितीमधील आहे. हा बेडूक 'गॅन्सुबाट्राचस किलियान्सेसिस' या प्रजातीमधील आहे. वायव्य चीनमधील एका ठिकाणी या बेडकाचे जीवाश्म आढळले. हे ठिकाण 145 दशलक्ष ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटाशियस काळाशी संबंधित आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'रॉयल सोसायटी बी : बायोलॉजिकल सायन्सेस' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या काळातील बेडकाचे जीवाश्म मिळणे ही एक दुर्मीळ घटना आहे. संशोधकांनी या जीवाश्माची तुलना अशा अन्य जीवाश्मांशी केली. त्यांनी या जीवाश्माचे सीटी स्कॅन करून बेडकाच्या सांगाडाचे एक हाय रिझोल्यूशन मॉडेल तयार केले. तसेच बेडकाच्या शरीरातील अंड्यांचा एक्स-रेच्या सहाय्याने अभ्यास केला. त्यावरून असे दिसून आले की ही मादी वयाने जास्त प्रौढ नव्हती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT