Mobile Pudhari
विश्वसंचार

Free App Scam: मोफत ॲपचा सापळा

तुमचा ॲन्ड्रॉईड फोन नकळत सायबर गुन्ह्यांचा भाग कसा बनतो?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : तुम्ही डाऊनलोड केलेला एखादा मोफत गेम किंवा साईडलोड केलेले युटिलिटी ॲप तुमचा ॲन्ड्रॉईड फोन नकळत सायबर गुन्ह्यांचा सहकारी बनवत असेल, याची कल्पनाही नसेल. गुगलने अलीकडेच इपिडिया नावाच्या चीनआधारित विशाल नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या नेटवर्कने जगभरातील 90 लाखांहून अधिक फोन हायजॅक करून, वापरकर्त्यांच्या घरगुती इंटरनेट कनेक्शनद्वारे संशयास्पद आणि घातक ट्रॅफिक वळवले.

इपिडियाने 600 पेक्षा जास्त ॲप्समध्ये खास सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटस्‌‍ लपवून ठेवले होते. ते विकसकांना ‌‘कमाईचे सोपे साधन‌’ म्हणून विकले जात होते. दिसायला निरुपद्रवी गेम्स, उत्पादकता ॲप्स आणि युटिलिटीज प्रत्यक्षात वापरकर्त्यांचा फोन ‌‘रेसिडेन्शियल प्रॉक्सी‌’ म्हणून वापरत होत्या. परिणामी, हे फोन हॅकर्स, हेरगिरी करणाऱ्या गटांसाठी आणि चीन, उत्तर कोरिया, इराण व रशियाशी संबंधित सायबर ऑपरेशन्ससाठी वापरले जात होते.

जानेवारीतील अवघ्या एका आठवड्यात 550 हून अधिक धोकादायक गटांनी इपिडिया नेटवर्कचा वापर केल्याचे उघड झाले. गुगलच्या इंटेलिजन्स ग्रुपने, क्लाऊड फेअर न्यायालये आणि सायबर सुरक्षा कंपन्यांच्या मदतीने या नेटवर्कचे सर्व्हर आणि डोमेन बंद केले. गुगल प्ले प्रोटेक्ट आता असे ॲप्स ओळखून ब्लॉक करत आहे. मात्र, थर्ड-पार्टी स्रोतांमधून साईडलोड केलेली ॲप्स अजूनही धोका ठरू शकतात. धडा स्पष्ट आहे फक्त अधिकृत ॲप स्टोअरवर विश्वास ठेवा आणि ‌‘खूपच चांगले वाटणारे‌’ मोफत ॲप्स टाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT