विश्वसंचार

Andhra Pradesh : चार महिन्यांची मुलगी ओळखते १२० वस्तू!

Arun Patil

हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या नंदीगामामधील अवघ्या चार महिन्यांच्या एका चिमुरडीने अनोखा विवश्वविक्रम केला आहे. कैवल्या नावाच्या या बालिकेला भाज्या, चित्रे यांच्यापासून ते पशुपक्ष्यांपर्यंतच्या अनेक गोष्टींची ओळख आहे. ती वेगवेगळ्या 120 वस्तू ओळखू शकते. याबाबत तिच्या नावाची नोंद नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे.

कैवल्यामधील या अनोख्या क्षमतेची जाणीव सर्वप्रथम अर्थातच तिच्या जन्मदात्रीला झाली. हेमा नावाच्या तिच्या आईनेच आपल्या लेकीमधील हे कौशल्य ओळखले. तिची ही प्रतिभा ओळखून हेमा यांनी तिचा एक व्हिडीओ तयार केला व तो नोबल वर्ल्ड रेकॉर्डस्कडे पाठवला. नोबल रेकॉर्डस्च्या टीमने हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून, तपासून तिच्या कुशाग्र स्मरणशक्तीबाबत तसेच वस्तू ओळखण्याच्या क्षमतेबाबत प्रमाणपत्र दिले. हा विश्वविक्रम 3 फेब्रुवारी 2024 मध्ये बनला.

चार महिन्यांच्या कैवल्याने 'शंभरपेक्षा अधिक फ्लॅशकार्ड ओळखणारे जगातील सर्वात लहान बाळ' म्हणून विक्रम केला आहे. तिची ही क्षमता अनेकांना थक्क करीत आहे. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असे आपल्याकडे म्हटले जाते. ही चार महिन्यांची कन्या मोठेपणी स्मरणशक्तीचे आणखी नवे विक्रम घडवेल यात शंकाच नाही!

SCROLL FOR NEXT