विश्वसंचार

पाच महिन्यांनंतर सुरक्षित परतले चार अंतराळवीर

Arun Patil

वॉशिंग्टन : एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' ने नवा इतिहास रचला आहे. यासोबतच 'नासा'च्या टीमने आणखी एक इतिहास रचला आहे. 'नासा'चे 'स्पेसएक्स' मिशन यशस्वी झाले आहे. पाच महिन्यानंतर चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. याचा व्हिडीओ 'नासा'ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यापूर्वी 'नासा'च्या दोन अंतराळवीरांना व अन्य देशांच्या दोन अंतराळवीरांना स्पेसएक्स कंपनीने अवकाशात पाठवले होते. फाल्कन-9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून चार अंतराळवीर अवकाशात गेले होते. 'नासा'ने एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' खासगी कंपनीच्या माध्यमातून अंतराळवीर अवकाशात पाठवले.

शनिवारी रात्री उशिरा हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावलेले ड्रॅगन कॅप्सूल शनिवारी रात्री उशिरा पृथ्वीवर परतले आहे. ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून मेक्सिकोच्या आखातात उतरली. पॅराशूटच्या मदतीने हे अंतराळवीर समुद्रावर उतरले. 'नासा'च्या 'स्पेस एक्स क्रू-5' मध्ये 'नासा' फ्लाईट कमांडर निकोल औनापू मान ज्या अंतराळातील पहिली मूळ अमेरिकन महिला आहेत.

'नासा'चा पायलट जोश कसाडा (वय 49), जपानी अंतराळवीर कोइची वाकाटा ( वय 59) आणि रोकोस्मोसचे कॉस्मोनॉट अन्ना किकिना हे चार आंतराळवीर सहभागी झाले होते. तब्बल 157 दिवस हे चार अंतराळवीर अवकाशात होते. हार्ट मसल टिश्यू, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मानवी पेशी व टिश्यू प्रिंट करणार्‍या बायोप्रिंटर तसेच औषध उत्पादनाच्या तंत्रज्ञानावरही संशोधन केले. 5 ऑक्टोबर 2022 रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून 'स्पेस एक्स' फाल्कन 9 रॉकेट अवकाशात झेपावले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT