विश्वसंचार

स्वीडिश वर्कप्लेसमध्ये ‘फिका’ ब्रेकची सक्ती!

Arun Patil

स्टॉकहोम : स्वीडनमधील कंपन्यांमध्ये आपल्या कार्यालयीन क्षेत्रात फिका ब्रेक अर्थात कॉफी ब्रेकची सक्ती आहे. तेथील कंपन्यांमध्ये सकाळी 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता अधिकृत फिका ब्रेक घेतला जातो. या ब्रेकदरम्यान सर्व कर्मचारी एकत्रित कॉफी घेतात. या उपक्रमामुळे कर्मचार्‍यातील वर्क रिलेशनशिप अधिक सरस होते, असा निष्कर्ष आहे. आईसलँडमध्येही वर्क लाईफ बॅलन्सला प्राधान्य दिले जाते. तेथे आई व वडील या दोघांनाही नवजात अपत्याच्या संगोपनासाठी 6 महिन्यांची पगारी रजा दिली जाते. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विदेशात असे प्रयोग सातत्याने राबवले जातात.

अन्य देशांमध्ये डेन्मार्क अधिकृत बैठकांमध्येही औपचारिक वातावरण ठेवण्यासाठी ओळखले जाते. मुक्त सुसंवाद आणि वर्क लाईफ बॅलन्समुळे वातावरण सौहार्दाचे राहते आणि याचा कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो, असे दिसून आले.

काही वर्षांपूर्वी फ्रान्सच्या सरकारने राईट टू डिसकनेक्ट नियम लागू केला होता. या नियमामुळे कर्मचार्‍यांना वर्क लाईफ बॅलन्स करता यावे, यासाठी स्वत:ला त्यापासून थोडे दूर करण्याची मुभा होती. फ्रान्समधील अनेक कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेनंतर कोणतेही अतिरिक्त काम दिले जात नाही. याप्रमाणेच अनेक देशांनी यासाठी वेगवेगळे धोरण ठरवले आहे. उदाहरणार्थ, जपानमधील कर्मचार्‍यांच्या तंदुरुस्तीची अधिक काळजी घेतली जाते. यासाठी तेथे बिझनेस फिलॉसॉफी काईजेन फॉलो केले जाते. याअनुसार तणाव कमी करण्यासाठी रेडिओ तायसोवर 15 मिनिटे कसरती करून घेतल्या जातात. यामुळे कर्मचार्‍यांची तंदुरुस्ती टिकून राहते आणि त्यांची कार्यक्षमताही वाढते, असा यात दुहेरी उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

SCROLL FOR NEXT