विश्वसंचार

होऊ द्या खर्च! खुल्या अवकाशात लवकरच फ्लाईंग रेस्टॉरंट!

Arun Patil

पॅरिस : घर असो किंवा हॉटेल, आपले खाणेपिणे नेहमी चार भिंतींच्या आत. क्वचित प्रसंगी बाहेर खाण्यापिण्याचा आस्वाद घेणारीही मंडळी असतात. पण, फ्रान्सच्या एका स्टार्टअपचा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू झाला, तर 2025 पर्यंत लवकरच आणखी एक पर्याय उपलब्ध होणार असून याद्वारे चक्क खुल्या अवकाशात आपल्याला खाण्यापिण्याची सुविधा होईल. बलूनमधील या फ्लाईंग रेस्टॉरंटवर झेफाल्टो ही स्टार्टअप कंपनी काम करत आहे. अर्थात, याची किंमत मात्र शब्दश: अव्वाच्या सव्वा असून या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी 9 लाख रुपये भरून बुकिंग करावे लागते आणि या अंतराळातील रेस्टॉरंटचे एका वेळचे बिल थोडेथोडके नव्हे, तर एक कोटी रुपये येऊ शकते!

सदर रेस्टॉरंट सुरू झाले, तर कोणतीही व्यक्ती 25 किलोमीटर उंचीवर हिलियम किंवा हायड्रोजनने भरलेल्या बलूनमध्ये बसून खुल्या अवकाशात भोजन करू शकेल. यासाठी सेलेस्टे नावाचे खास बलून कॅप्सूल विकसित केले जात आहे. एकाच ठिकाणी 90 मिनिटे स्थिर थांबण्याची या कॅप्सूलची क्षमता असणार आहे. यामुळे हौशी लोकांना याचा आनंद लुटता येईल. मिशेलिन स्टार भोजन यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

एअरबसच्या इंजिनिअर्सचे डिझाईन

वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सेलेस्टे कॅप्सूलचे डिझाईन एअरबसच्या इंजिनिअर्सनी केले असून यासाठी त्यांना फ्रान्स व युरोपियन अंतराळ एजन्सींचे सहकार्य मिळाले. या कॅप्सूलचा वेग प्रतिसेकंद 4 मीटर इतका असेल आणि दीड तासात अंतर कापले जाईल. या कॅप्सूलमध्ये 6 पॅसेंजर व 2 पायलट असतील. कॅप्सूल 3 तास पृथ्वीच्या वर असेल. 25 किलोमीटरवर पोहोचल्यानंतर फ्रेंच वाईन व फ्रेंच खाद्यपदार्थांचा आनंद लुटता येणार आहे. अर्थात, यासाठी खर्चही बराच येणार असून 9 लाख रुपये भरून त्याचे बुकिंग करता येईल आणि राऊंड ट्रीपसाठी जवळपास 1 कोटी रुपये मोजावे लागू शकतात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT