नैरोबी : जगभरात अनेक समुदाय आहेत आणि त्यांचे जन्म, लग्न यापासून मृत्यूपर्यंतचे विधी वेगवेगळे आहेत. विशेषतः लग्नाबाबत ज्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहायला मिळतात, त्या पाहून अनेक वेळा आश्चर्य वाटते. जगभरातील आदिवासी समुदायांमध्येही अशा काही अनोख्या परंपरा आहेत. 'हमार' नावाच्या एका समुदायात लग्न ठरलं की नवरीला पाच महिने चिखल लावण्याची परंपरा आहे! नैऋ त्य इथिओपियात हा समुदाय आहे.
या काळात ही महिला कुणाला भेटू शकत नाही की बाहेर जाऊ शकत नाही. एक प्रकारे ती पाच महिने बंदिस्तच असते. यावेळी तिच्या शरीरावर खास प्रकारची लाल माती लावली जाते. डोक्यापासून पायापर्यंत तिला असे चिखलाने माखले जाते. या मातीला समुदायात अतिशय खास असे महत्त्व आहे. लग्नासाठी केवळ महिलांनाच असे आव्हान पार करावं लागते असे नाही. पुरुषांसाठीही त्यांचे सामर्थ्य दाखविण्यासाठी आव्हान असते. ज्या पुरुषांना लग्न करायचे असते त्यांना 'बुल जंप'चे आव्हान पार पाडावे लागते. त्यामध्ये तीन किंवा चार बैलांवरून उडी घ्यावी लागते. या समुदायात लग्नाची इच्छा असलेल्या पुरुषाने काही गायी व बकर्या महिलेच्या कुटुंबाला द्याव्या लागतात.