विश्वसंचार

क्षणार्धात ‘इंद्रधनुषी’ रंगांची उधळण करणारा मासा!

Arun Patil

नवी दिल्ली : अमेरिकेतील 'शामेलिऑन' सरडा झटपट रंग बदलतो, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. मात्र, एखादा मासा असेच रंग बदलू लागला, तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

'फ्लशिंग टाईलफिश' नावाचा हा मासा क्षणार्धात असे रंग बदलतो की, आपली डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्याने दुसरा रंग धारण केलेला असतो. याला निसर्गाचा चमत्कार असेही म्हणता येईल. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या अनोख्या माशाची माहिती व्हिडीओद्वारे शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हजारो जणांनी तो पाहिला आहे.

या माशाची खासियत अशी की, वातावरणानुसार तो आपले रंग बदलतो. कधी गडद निळा, कधी गडद पिवळा, तर कधी गर्द हिरवा… असे अनेक प्रकारचे रंग क्षणार्धात हा मासा बदलत असल्यामुळे त्याचे नामकरण 'फ्लशिंग' असे करण्यात आले आहे. आता यामागील शास्त्रीय कारण जाणून घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे या माशाच्या त्वचेमध्ये खास प्रकारची प्रथिने असतात. त्यामुळे विविध रंगांची उधळण त्यातून होत असते. या माशाचा आकारही छोटा असतो. सागरात तो सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. शांत स्वभावाचा हा मासा इंद्रधनुष्यासारखी रंगांची उधळण करत असल्यामुळे चर्चेत असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

SCROLL FOR NEXT