जगातील पहिल्या ‘मिस वर्ल्ड’चे निधन Pudhari File Photo
विश्वसंचार

जगातील पहिल्या ‘मिस वर्ल्ड’चे निधन

वयाच्या 95 व्या वर्षी झालं निधन

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा ही विश्वातील एक मोठी स्पर्धा मानली जाते. सगळ्या जगाच्या नजरा या स्पर्धेकडे असतात. ही स्पर्धा जिंकणारी स्पर्धक सुपरस्टार बनते. जगातील पहिली मिस वर्ल्ड अर्थात ‘जगतसुंदरी’ हा किताब मिळवणार्‍या स्वीडिश मॉडेल किकी हॅकन्सन यांचीही अशीच ओळख होती. हा किताब पहिल्यांदा मिळवणार्‍या किकी हॅकन्सन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं आहे.

1951 मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरी या बिरुदाचा मुकुट ठेवण्यात आला होता. जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आता जगाचा निरोप घेतला आहे. कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरातील लाखो मॉडेल्ससाठी प्रेरणास्थान असलेल्या किकी हॅकन्सनच्या मृत्यूची माहिती मिस वर्ल्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे. ज्यामध्ये किकीच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांनी तिच्या फोटोसह दिली आहे. त्या त्यांच्या कॅलिफोर्नियामधील घरी होत्या. किकी हॅकन्सन यांचा मृत्यू झोपेतच झाला.

पोस्टनुसार, “किकी हॅकन्सन यांचा 4 नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच मृत्यू झाला. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.” किकी हॅकन्सन यांनी 1951 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा त्या जिंकल्या. किकी हॅकन्सन यांनी जिंकलेल्या मिस वर्ल्ड या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरू झाली. मिस वर्ल्ड हे या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टवरून किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

आम्ही सगळे किकी हॅकन्सन यांच्या निधनाच्या दुःखात सहभागी आहोत. आमचं प्रेम, सद्भावना हे कायमच किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबासह असेल, अशी पोस्ट या पेजवरून करण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकण्याआधी ‘मिस स्वीडन’ हा किताबही जिंकला होता. किकी हॅकन्सन यांचा मुलगा ख्रिस अँडरसन यांनी म्हटलं आहे, ‘माझी आई आज जगात नाही, ती खूप दयाळू, प्रेमळ आणि एखाद्या मैत्रिणीप्रमाणे होती. तिची विनोदबुद्धी खूप चांगली होती तसंच ती अत्यंत मोठ्या मनाची होती. तिने जे संस्कार आमच्यावर केले आहेत, त्यामुळे आम्हाला कायमच तिची आठवण येत राहील.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT