विश्वसंचार

सुरतच्या कंपनीने बनवले ‘चांद्रयान-3’चे फायरप्रूफ सिरॅमिक घटक

backup backup

सुरत ः सध्या 'चांद्रयान-3' च्या प्रक्षेपणाकडे देशाचे आणि जगाचेही लक्ष लागून राहिले आहे. गुजरातमधील सुरत येथील एका अभियांत्रिकी कंपनीसाठीही हा अभिमानाचा क्षण असेल. या चांद्रयानामध्ये वापरलेले फायर-प्रूफ सिरॅमिक घटक या कंपनीने 'इस्रो'ला पुरवले आहेत. या सिरॅमिक घटकाला "स्क्विब्ज" असे म्हणतात. ते फायरप्रूफ आहेत आणि 3000 अंश सेल्सिअस तापमानातही वितळणार नाहीत. हा घटक चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

फायरप्रूफ सिरॅमिक पार्टस् सुरतच्या 'हिमसन इंडस्ट्रियल सिरॅमिक कंपनी'ने पुरवले आहेत. ही कंपनी गेल्या 30 वर्षांपासून 'इस्रो'ला 'स्क्विब्ज'चा पुरवठा करत आहे. चांद्रयान-2 मध्येही याच कंपनीच्या स्क्विब्जचा वापर करण्यात आला होता. आंध— प्रदेशातल्या श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण होईल. यामध्ये इन्स्टॉलेशन आणि इग्निशनची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

चांद्रयान अवकाशात सोडलं जातं, तेव्हा त्याच्या खालच्या भागात एक प्रचंड स्फोट घडवून आणला जातो. त्यामुळे उष्णता निर्माण होते. त्यावेळी तिथलं तापमान सुमारे 3000 अंश सेल्सिअस असते. या अत्यंत उच्च तापमानामुळे लाँच व्हेईकलच्या तारा आणि वायरिंग जळू शकतं. अशा अत्यंत उच्च तापमानापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, या वायर्स आणि वायरिंग्जना सिरॅमिक कोटिंग आहे. या कोटिंगसाठी हिमसन कंपनीने पुरवलेले स्क्विब्ज वापरले आहेत. स्क्विब्ज उच्च तापमानापासून तारा आणि वायरिंगचे रक्षण करतात.

SCROLL FOR NEXT