विश्वसंचार

जोडीदाराशिवाय मादी मगर देते पिल्लांना जन्म!

Arun Patil

न्यूयॉर्क : काही प्रजातींमध्ये कधी कधी अलैंगिक प्रजनन पाहायला मिळते. अशावेळी माद्या नराशी मीलन न होताच पिल्लांना जन्म देतात. ही पिल्ली मादीच असतात व ती हुबेहूब आईची 'कॉपी' असतात. आता असाच प्रकार अमेरिकेतील कोस्टारिकाच्या प्राणीसंग्रहालयात घडत आहे. तिथे एक अशी मादी मगर आहे जी नराशी कोणताही संबंध नसतानाच 2018 पासून अंडी घालत आहे. या अंड्यांमधून येणारी पिल्लीही तिच्यासारखीच आहेत.

'व्हर्जिनिया पॉलिक्लिनिक'च्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही पिल्ली 99.9 टक्के आपल्या आईसारखीच आहेत. त्याचा असाही एक अर्थ होतो की त्यांचा कुणीही पिता नाही. त्यांचे माता-पिता ही मादी मगरच आहे. अशा प्रकारच्या प्रजननास 'व्हर्जिन बर्थ' असेही म्हटले जाते. मासे, पक्षी आणि काही सरीसृपांमध्ये असे प्रकार दिसून येतात.

मात्र, मगरींमध्ये असा प्रकार यापूर्वी दिसून आला नव्हता. रॉयल सोसायटी जर्नल 'बायोलॉजी लेटर्स'मध्ये संशोधकांनी दावा केला होता की पार्थेनोजेनेसिसची प्रक्रिया मगरींमध्येही सामान्यतः असते; पण ती अद्याप कुणाच्या नजरेस आलेली नाही. ज्यावेळी एखाद्या प्रजातीमध्ये संख्या घटते किंवा आसपास जोडीदार उपलब्ध नसतो, त्यावेळी अशा प्रकारचे प्रजनन घडत असते.

SCROLL FOR NEXT