बापाने लेकीला हुंडा म्हणून दिल्या 100 मांजरी Pudhari File Photo
विश्वसंचार

बापाने लेकीला हुंडा म्हणून दिल्या 100 मांजरी

कुटुंबीयांनी दिलेल्या या हुंड्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

पुढारी वृत्तसेवा

जाकार्ता : जगाच्या पाठीवर हुंडा पद्धत अनेक ठिकाणी पाहायला मिळते. फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. हुंड्यात आलेल्या वस्तूंबाबत जगभरातून अनेक बातम्या येत असतात. लोक सोने, चांदी, हिरे, लक्झरी कार, घरे आणि हुंड्यात काय देत नाहीत. मात्र, व्हिएतनाममधील एका मुलीच्या कुटुंबीयांनी तिला हुंड्यासाठी सोन्याचे बार आणि कंपनीच्या शेअर्ससह 100 सिवेट मांजरी दिल्या.

या 100 मादी सिवेट मांजरींची किंमत अंदाजे 1.8 अब्ज व्हिएतनामी रुपये (60 लाख रुपये) पेक्षा जास्त आहे. त्या बदल्यात नवरदेवाच्या कुटुंबीयांनी वधूला 10 तोळे सोने, 6 लाख रुपये रोख आणि हिर्‍याचे दागिने दिले. कुटुंबीयांनी दिलेल्या या हुंड्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामध्ये सिवेट मांजरींची बरीच चर्चा आहे. चला तर मग जाणून घेऊया मांजरी देण्यामागे कुटुंबाचा हेतू काय आहे.

व्हिएतनाममध्ये सिवेट मांजरींची किंमत खूप जास्त आहे. ज्या मांजरीने बाळाला जन्म दिला आहे, त्याची किंमत 700 डॉलर असू शकते. तर गर्भवती मांजरीची किंमत 27 दशलक्ष डॉलरपर्यंत असू शकते.

या मांजरी खास प्रकारची कॉफी बनवण्यातही उपयुक्त ठरतात. कॉफी उत्पादनातील त्यांच्या भूमिकेव्यतिरिक्त, सिवेट मांस चीन आणि व्हिएतनाममध्ये लक्झरी अन्न म्हणूनदेखील पाहिले जाते आणि पारंपरिक चिनी औषधांमध्ये वापरले जाते. तथापि, वर्ल्ड अ‍ॅनिमल प्रोटेक्शन इंटरनॅशनलने अहवाल दिला आहे की, सिवेट मांजरी बर्‍याचदा बॉक्स ट्रॅप आणि फंदा यासारख्या हानिकारक पद्धतींचा वापर करून जंगलातून पकडल्या जातात.

याबाबत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुले शिक्षण घेऊन कौटुंबिक व्यवसायात मदत करत आहेत. अशा वेळी आपल्या मुलीकडे एवढी संपत्ती असावी की, ती आपले उत्पन्न वाढवू शकेल, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी मांजरी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT