विश्वसंचार

12 वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास!

Arun Patil

ब्रुसेल्स : तसे म्हटले तर देशविदेशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आव्हानात्मकच. व्यावहारिक नियमाबरोबरच पुस्तकी नियमाचीही त्यात माहिती असावी लागते. ड्रायव्हिंग लायसन्ससठी चाचणीत या दोन्ही बाबींची पारख केली जाते आणि त्यात उत्तम गुण मिळवले तरच आपल्याला लायसन्स मिळते. आता काही देशातील नियम सहजसोपे असू शकतात. पण, बल्जियममध्ये अतिशय कडक नियम आहेत आणि याचा फटका एका व्यक्तीला असाही बसला की, तो चक्क 12 वेळा तेथे चाचणीत नापास होत गेला. त्यानंतर मात्र त्याने असा एक जुगाड शोधण्याचा प्रयत्न केला की, पोलिसांनी त्याला जेरबंद करून टाकले!

ऑडिटी न्यूज सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, सर्ज नावाची ही व्यक्ती मूळची घाना येथील नागरिक. पण, त्याचे वास्तव्य बेल्जियममध्ये होते. आता त्याची अडचण ही होती की, तो घानाचे लायसन्स घैऊन बेल्जियममध्ये ड्रायव्हिंग करू शकत नव्हता. लायसन्स तर त्याच्यासाठी इतके महत्त्वाचे होते की, त्याशिवाय तो टॅक्सी चालवल्याशिवाय पैसेच मिळवू शकत नव्हता. तो प्रॅक्टिकलमध्ये हुशार होता, पण लेखी परीक्षेत दांडी उडायची. त्यामुळे, तो सातत्याने नापास होत होता.

एक वेळ तर अशी आली की, तो 12 वेळा नापास झाला. पण, नंतर त्याने असा प्लॅन रचला की, पैसे चारून इतरांना परीक्षेला बसवायचे आणि परीक्षा पास करवून घेत लायसन्स मिळवावे. आपल्याप्रमाणेच चेहरामोहरा असलेल्या जो काँगो येथील जुलिनला तो भेटला. परीक्षेचा व्यवहार ठरला आणि सर्जऐवजी जुलिन परीक्षेला गेला. हॉलमध्ये मात्र निरीक्षकांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही आणि त्यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. सर्जला आता एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली गेली असून जुलिनला 200 तास कम्युनिटी सर्व्हिसचा दंड सुनावण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT