File Photo
विश्वसंचार

रोज तासापेक्षा अधिक स्क्रीन पाहिल्यास वाढते दृष्टिदोषाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : टॅबलेट किंवा स्मार्टफोनसारख्या डिजिटल स्क्रीनवर रोज एक ते चार तासांपेक्षा अधिक वेळ व्यतित केल्यास नजीकचा द़ृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता 21 टक्यांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. नजीकच्या द़ृष्टिदोषाला ‘मायोपिया’ या नावाने ओळखले जाते. जामा नेटवर्क ओपन या जर्नलमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासात 45 विभिन्न चाचण्या घेत त्याच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये लहान मुलांपासून युवा वर्गार्पंयतच्या 3 लाख 35 हजारांहून अधिक जणांचा समावेश होता.

या सर्वेक्षणात असे आढळून आले की, रोज एक तासापेक्षा कमी वेळ स्क्रीन पाहिला जात असेल तर फारशी समस्या निर्माण होत नाही; मात्र 1 ते 4 तासांपर्यंतचे स्क्रीन टाईम असेल तर मायोपियाचा धोका निश्चितपणाने वाढतो. ज्या-ज्यावेळी जवळचा नंबरचा चष्मा लागतो, त्या-त्यावेळी स्क्रीन टाईम हीच मुख्य समस्या असते.

या अभ्यासात ही समस्या टाळण्यासाठी काय उपाय करावा, याचेही विवेचन करण्यात आले आहे. डोळ्यावर स्क्रीनचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी 20-20-20 चा नियम अवलंबणे उपयुक्त ठरेल, असे यात सुचवण्यात आले आहे. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक 20 मिनिटांनी डिजिटल स्क्रीनपासून किमान 20 सेकंद दूर रहावे आणि 20 फूट लांबीवरील एखादी गोष्ट पाहण्याचा प्रयत्न करावा, असे यात म्हटले आहे. याशिवाय, दिवसभरातील दोन तास सूर्यप्रकाशात व्यतित केल्यास डोळ्यांची थकावट कमी केली जाऊ शकते. निकटचा द़ृष्टिदोष घालवण्यासाठी स्क्रीन सेटिंगमध्ये बदल, फिल्टरेशन, स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवणे, असे उपायही केले जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT