मोबाईलच्या अति वापराने स्मरणशक्तीवर परिणाम 
विश्वसंचार

मोबाईलच्या अति वापराने स्मरणशक्तीवर परिणाम

मनुष्याच्या वर्तणुकीवरही मोबाईलचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मेक्सिको : दिवसभराच्या धावपळीने आपल्यापैकी बरेच जण हैराण होत असतात, ही वस्तुस्थिती आहे. तरीही झोपेच्या वेळी यानंतरही बहुतांशी जण मोबाईल स्क्रीनच्या आहारी जातात. काहींना उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम करावे लागते. हा असा अतिरिक्त स्क्रीन टाईम अतिशय घातक असतो, हे सर्वश्रुत आहे. पण, तरीही ही सवय जणू अफूची गोळी ठरत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर एका अभ्यासात मोबाईलच्या वाढत्या स्क्रीन टाईममुळे आपल्या स्मरणशक्तीवर याचा विपरित परिणाम होतो, असे आढळून आले आहे. अगदी मनुष्याच्या वर्तणुकीवरही याचा परिणाम होतो, असा दावा तज्ज्ञांनी यावेळी केला आहे.

रात्री उशिरा मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करण्याची सवय चांगली झोप घेण्यास अडचणी आणत आहे. यामुळे स्मरणशक्तीवरही प्रतिकूल प्रभाव पडू लागला आहे. याचे थेट परिणाम व्यक्तीच्या वर्तणुकीवर देखील दिसून येत आहेत. लवकर राग येणे, अचानक वर्तणूक बदलणे हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की झोप शरीरासाठी संजीवनीचे काम करते. सामान्य व्यक्तीला रात्री 7 ते 8 तासांची झोप घ्यावी लागते, कारण झोपेत असताना शरीर आणि मेंदू ‘रीचार्ज‘ होते. झोपेच्या दरम्यान मेंदूमध्ये असे रसायन तयार होतात, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती अधिक गाढ आणि तीव— होते. पण, या जीवनशैलीत लोक कमी झोप घेत आहेत, ज्यामुळे त्यांच्या मेंदूवर प्रतिकूल प्रभाव पडत आहे.

एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मंजरी त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, अलीकडील काळात मोबाईल आणि लॅपटॉपमुळे लोकांची झोप खराब होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. एम्समध्ये येणार्‍या रुग्णांमध्ये अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे. बहुतेक लोक यामुळे त्रस्त आहेत. त्यांनी सांगितले की, योग्य झोप घेणे शरीर आणि मेंदूला रीचार्ज करते. रात्री झोप येत नसेल तर ‘इन्सोम्निया’चा त्रास होऊ शकतो. खराब झोपेची सवय, नैराश्य, चिंता, व्यायामाची कमी, जुने विकार किंवा काही औषधांचे ज्ञात नसलेले साईड इफेक्टस् याला कारणीभूत ठरू शकतात. यामध्ये झोप येण्यात, चांगली झोप घेण्यात अडचण येते. यामुळे शरीरात विश्रांतीची कमी जाणवते. अनिद्रेद्वारे उपचारांमध्ये झोपेच्या सवयींचा सुधार, थेरपी आणि अन्य कारणांचा शोध घेऊन त्यावर उपचार करणे समाविष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT