विश्वसंचार

शुक्रावरील ज्वालामुखीचा मिळाला पुरावा

Arun Patil

वॉशिंग्टन : शुक्र ग्रहावर अलीकडच्या काळात झालेल्या ज्वालामुखीचा पहिला पुरावा खगोलशास्त्रज्ञांना मिळाला आहे. हा पुरावा 'नासा'च्या मॅगेलन मोहिमेतील डाटामधून शोधण्यात आला आहे. शुक्रावरील 8 किलोमीटर उंचीच्या मॅट मोन्स या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा हा पुरावा आहे. तो 1991 मध्ये सक्रिय झाला होता.

मे 1989 मध्ये मॅगेलन मोहीम सुरू करण्यात आली होती. शुक्र ग्रहाच्या संपूर्ण पृष्ठभागाचा नकाशा तयार करण्यासाठी पाठवण्यात आलेले हे पहिले अंतराळयान होते. या मोहिमेत यानाने शुक्राची अनेक रडार छायाचित्रे टिपली. त्यामधून दिसून आले की हा ग्रह अनेक ज्वालामुखींनी भरलेला आहे. मात्र, त्यापैकी किती सक्रिय आहेत याची माहिती नव्हती. आता तीस वर्षांपूर्वीचा हा डाटा नव्याने खंगाळण्यात आला. त्यामधून शुक्राच्या 'अ‍ॅटला रिजियो' असे नाव दिलेल्या भागातील हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता असे दिसून आले. हे ठिकाण शुक्राच्या विषुववृत्ताजवळ आहे. मॅट मोन्स हा शुक्रावरील सर्वात उंच ज्वालामुखी असून त्याची उंची 26,250 फूट म्हणजेच 8 हजार मीटर इतकी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT