विश्वसंचार

जगाच्या 7 वर्षे मागे चालतोय ‌‘हा‌’ देश! जाणून घ्या जगातील 'या' अनोख्या देशाबद्दल

तर इथे लोक आजही जगतायत ७ वर्षांपूर्वीचे आयुष्य

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः विज्ञान जगतात ‌‘टाईम ट्रॅव्हल‌’ म्हणजेच काळात पुढे किंवा मागे जाणे हे नेहमीच एक मोठे रहस्य राहिले आहे. या संकल्पनेवर अनेक हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटही बनले आहेत; पण तुम्हाला माहीत आहे का, की आपल्या पृथ्वीवर एक असा अनोखा देश आहे जिथे जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ‌‘टाईम मशिन‌’ची गरज नाही? होय, हे अगदी खरे आहे. जिथे संपूर्ण जग आज 2026 मध्ये जगत असून, भविष्याकडे वाटचाल करत आहे, तिथे या देशातील लोक आजच 7 वर्षे मागे म्हणजेच 2019 मध्ये जगत आहेत.

ही गोष्ट एखाद्या चित्रपटाची कथा किंवा अफाट अफवा वाटू शकते; पण यामागचे खरे कारण इतके रंजक आहे की, ते ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. जाणून घेऊया या अनोख्या देशाबद्दल आणि त्यामागच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक सत्याबद्दल... जगाच्या 7 वर्षे मागे चालणाऱ्या या देशाचे नाव आहे इथियोपिया. आफ्रिका खंडात असलेला हा देश आपल्या प्राचीन संस्कृती, सुंदर दऱ्याखोऱ्या आणि अनोख्या परंपरांसाठी ओळखला जातो. पण, सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे इथियोपियाची स्वतःची वेळ आणि स्वतःचे कॅलेंडर आहे. जेव्हा एखादा विदेशी पर्यटक येथे भेट देतो, तेव्हा त्याच्या स्मार्टफोन आणि घड्याळात जरी 2026 हे वर्ष दिसत असले, तरी येथील सरकारी कार्यालये, वर्तमानपत्रे आणि कॅलेंडरवर मात्र 2019 हेच वर्ष नोंदवलेले असते.

इथियोपिया जगाच्या मागे असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची कॅलेंडर प्रणाली. आज संपूर्ण जगात जे कॅलेंडर वापरले जाते, त्याला ‌‘ग््रेागोरियन कॅलेंडर‌’ म्हणतात, ज्याची सुरुवात 1582 मध्ये झाली होती. परंतु, इथियोपियाच्या लोकांनी हे नवीन कॅलेंडर स्वीकारण्यास साफ नकार दिला. इथियोपियातील ऑर्थोडॉक्स चर्च आजही त्यांच्या प्राचीन ‌‘इथियोपियन कॅलेंडर‌’चे पालन करते. ग््रेागोरियन कॅलेंडर येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख ज्या आधारावर मोजते, इथियोपियन कॅलेंडरची गणना त्यापेक्षा सुमारे 7 ते 8 वर्षे वेगळी आहे. याच कारणामुळे दोन्ही कॅलेंडरमध्ये हा मोठा फरक पडला असून, इथियोपिया जगाच्या 7 वर्षे मागे राहिला आहे. या कॅलेंडरची आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे, जिथे आपल्या कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात, तिथे इथियोपियाच्या कॅलेंडरमध्ये पूर्ण 13 महिने असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT