एंडोमेट्रिओसिस : संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा ‘इम्यून’ आजार 
विश्वसंचार

एंडोमेट्रिओसिस : संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा ‘इम्यून’ आजार

पुढारी वृत्तसेवा

लंडन: जगभरातील 10 टक्के महिलांना भेडसावणारा ‘एंडोमेट्रिओसिस’ हा एक अत्यंत वेदनादायक आणि अशक्त करणारा आजार आहे. गर्भाशयाच्या अस्तरासारख्या ऊती जेव्हा गर्भाशयाबाहेर, प्रामुख्याने ओटीपोटाच्या भागात वाढू लागतात, तेव्हा हा त्रास होतो. आतापर्यंत याकडे केवळ स्त्रीरोगविषयक समस्या म्हणून पाहिले जात होते; परंतु नवीन संशोधनानुसार हा आजार संपूर्ण शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

एंडोमेट्रिओसिसवर उपचार करणे कठीण असते. सहसा शस्त्रक्रियेद्वारे या वाढलेल्या ऊती काढून टाकल्या जातात, तरीही अनेक रुग्णांमध्ये लक्षणे कमी होत नाहीत. संशोधकांचे असे मत आहे की, या आजाराला केवळ पुनरुत्पादन प्रणालीशी मर्यादित मानल्यामुळे त्याची गुंतागुंत समजून घेण्यास उशीर झाला आहे. हा आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर व्यापक परिणाम करतो. निरोगी शरीरात जखम किंवा आजार झाल्यास ‘सूज’ येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, एंडोमेट्रिओसिसमध्ये ही प्रक्रिया अनियंत्रित होते, जशी ती संधिवातासारख्या ऑटोइम्यून आजारांमध्ये दिसते.

संशोधनानुसार, एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिलांच्या रक्तात IL-6 आणि IL-1 सारख्या ‘सायटोकाइन्स’ (रोगप्रतिकारक प्रथिने) ची पातळी जास्त असते. ही प्रथिने शरीरात सूज वाढवण्याचे काम करतात. रोगप्रतिकारक पेशींमधील बिघाडामुळे शरीराला या अनैसर्गिक ऊती नष्ट करता येत नाहीत, परिणामी त्या वाढतच राहतात. हा आजार संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा असल्याने, रुग्णांना केवळ ओटीपोटातच नव्हे, तर इतरत्रही त्रास होतो. संशोधनात खालील लक्षणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.तीव्र थकवा : दैनंदिन कामे करणे कठीण होईल इतका थकवा जाणवणे. ब्रेन फॉग : एकाग्रतेत अडथळा येणे किंवा विचार करताना गोंधळणे. व्यापक वेदना : शरीराच्या इतर भागांतही वेदना होणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT