विश्वसंचार

विचित्र धातूंमध्ये वीज वाहते पाण्यासारखी, कारण अज्ञात!

Arun Patil

वॉशिंग्टन : काही विचित्र धातूंच्या एका समूहात वीज पाण्याच्या प्रवाहासारखी वाहते असे दिसून आले आहे. याचे कारण मात्र अज्ञातच आहे. संशोधकांनी 'स्ट्रेंज मेटल्स' असेच नाव दिलेल्या सामग्रीपासून बनवलेल्या नॅनो म्हणजेच अतिशय सूक्ष्म आकाराच्या वायरमधून वीज प्रवाह सोडून याबाबतचे प्रयोग केले. त्यामध्ये असे दिसून आले की अन्य धातूंप्रमाणे यामध्ये वीज इलेक्ट्रॉन्सच्या समूहातून हालचाल करीत नाही.

जर याबाबतचे निरीक्षण अचूक असेल तर त्यामधून स्ट्रेंज मेटल्सवर नवा प्रकाश पडू शकतो. सुमारे 40 वर्षांपूर्वी मेटल्स म्हणजेच धातूंचा भौतिकशास्त्रद़ृष्ट्या शोध लागून त्याबाबत ज्या धारणा होत्या त्या यामुळे बदलू शकतात. धातूंमधून विद्युतभाराचे कसे वहन होते हे यामधून दिसू शकते. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स' या नियतकालिकातून देण्यात आली आहे. 'स्ट्रेंज मेटल्स' हे क्वांटम मटेरियलचा एक प्रकार आहे ज्यामध्ये खरोखरच काही अतिशय विचित्र गुणधर्म असतात. यापैकी काही धातू उच्च तापमानात विजेचे 'सुपरकंडक्टर' बनतात. त्यांच्यामधून वीज कोणत्याही अडथळ्याशिवाय, अवरोधाशिवाय धाराप्रवाह पद्धतीने वाहते.

SCROLL FOR NEXT