वॉशिंग्टन : अनेकदा आपण मित्रांसोबत आवडीने फोटो काढतो, पण कधी फोटो अंधारात येतो तर कधी हात हलल्यामुळे तो धुसर होतो. कधी जास्त सूर्यप्रकाशामुळे फोटो खराब होतो, तर कधी चेहर्यावर नको असलेले रिफ्लेक्शन येते. अशा फोटोंमुळे आनंदावर विरजण पडते आणि ते सोशल मीडियावर शेअर करायलाही आपण कचरतो. पण आता चिंता करण्याची गरज नाही, कारण गुगलने आपल्या ‘फोटोज’ अॅपमध्ये एक क्रांतिकारक बदल केला आहे.
गुगलने भारतातील युजर्ससाठी ‘गूगल फोटोज’मध्ये एक नवीन अपडेट आणले आहे. या फिचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता फोटो एडिट करण्यासाठी तुम्हाला क्लिष्ट सेटिंग्स शोधण्याची गरज नाही. गुगलच्या ‘जेमिनी’ या एआय मॉडेलमुळे आता तुम्ही फक्त बोलून किंवा मजकूर लिहून फोटोमध्ये काय बदल हवे आहेत, हे सांगू शकता. अँड्रॉइड युजर्सना अनेकदा चांगल्या एडिटिंगसाठी थर्ड-पार्टी अॅप्स डाऊनलोड करावे लागतात, ज्यामुळे डेटा चोरीचा धोका असतो. गुगलने ही समस्या सोडवली आहे. प्रायव्हसी : हे फीचर पूर्णपणे सुरक्षित असून युजरच्या गोपनीयतेची काळजी घेते.
नॅचरल लुक्स : एआय तुमच्या गॅलरीतील चेहर्यांच्या ग्रुपचा अभ्यास करून एडिटिंग करते, ज्यामुळे फोटोमधील व्यक्तींचे हावभाव नैसर्गिक राहतात. गुगलच्या माहितीनुसार, हे नवीन एआय एडिटिंग फिचर भारतातील अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. यासाठी काही अटी आहेत : रॅम ( RAM) : फोनमध्ये किमान 4 GB रॅम असणे आवश्यक. व्हर्जन : अँड्रॉइड 8.0 किंवा त्यावरील व्हर्जन. भाषा : हे फिचर इंग्रजीसह मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली आणि गुजराती अशा भारतीय भाषांमध्ये काम करते. फोटोमध्ये फेरफार केल्याबाबत पारदर्शकता राखण्यासाठी गुगलने ‘C2 PA’ कंटेंट क्रिडेंशियलचा आधार घेतला आहे. याचा अर्थ असा की, अख द्वारे एडिट केलेल्या प्रत्येक फोटोवर एक कायमस्वरूपी ‘डिजिटल लेबल’ असेल. यामुळे समोरच्या व्यक्तीला कळू शकेल की हा फोटो मूळ नसून एडिट केलेला आहे.
1. अॅप अपडेट करा : सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून तुमचे Google Photos अॅप अपडेट करा.
2. फोटो निवडा : तुम्हाला जो फोटो सुधारायचा आहे, तो ओपन करा.
3. Edit वर जा : खाली दिलेल्या ‘Edit’ पर्यायावर क्लिक करा.
4. Help me edit : येथे तुम्हाला ‘Help me edit’ हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
5. आदेश द्या : आता माईक बटण दाबून बोलून सांगा (उदा. ‘या फोटोचा प्रकाश वाढवा’ किंवा ‘बॅकग्राउंड बदला’).
6. सेव्ह करा : काही सेकंदात AI बदल करेल, त्यानंतर तुम्ही फोटो सेव्ह करू शकता.