[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
वॉशिंग्टन : महासागरालाही कधी गळती लागते का? पण पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेटस् हलल्या तर असेही घडू शकते! आता जगातील सर्वात मोठा महासागर असलेल्या पॅसिफिक महासागराच्या (Pacific Ocean) तळाशी 965 कि.मी. लांबीच्या फॉल्ट लाईनमध्ये एक छिद्र आढळले आहे. या 'गळती'मुळे अमेरिकेच्या किनारपट्टीवर 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. 'पायथियास ओएसिस' नावाच्या छिद्रातून 4 कि.मी. खाली अडकलेला द्रव समुद्रात सोडला जात आहे. हा द्रवपदार्थ टेक्टोनिक प्लेटस्मध्ये लुब्रिकंट म्हणून काम करतो.
हे छिद्र विनाशकारी भूकंपाची सुरुवात करू शकते, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या तीव्र भूकंपामुळे अमेरिकेच्या वायव्येकडील शहरे नष्ट होतील. उष्ण द्रव पदार्ध बाहेर पडत असलेले छिद्र ओरेगॉनच्या किनार्यापासून 50 मैल अंतरावर आहे, जे 'कॅस्केडिया सबडक्शन झोन' म्हणून ओळखले जाते. या छिद्रामुळे तब्बल 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
या छिद्रातून द्रव पदार्थ बाहेर पडण्याचे द़ृश्य सर्वात आधी 2015 मध्ये पाहायला मिळाले होते. या द्रव पदार्थामुळे प्लेटस्ला सहज हलवता येते, परंतु याशिवाय "दाब निर्माण होऊन विनाशकारी भूकंप होऊ शकतो." हे छिद्र कॅस्केडिया सबडक्शन झोनच्या सीमेवर आहे आणि रासायनिकद़ृष्ट्या वेगळे द्रव सोडते. दरम्यान, संशोधकांनी जाहीर केलेल्या पेपर्समध्ये अहवाल दिला आहे की, "ऑरेगॉनच्या किनार्यापासून 3,280 फूट खाली समुद्रसपाटीपासून खार्या, उच्च-तापमानाचे, खनिज-समृद्ध पाण्याचे गिझर शोधणे आता अर्थहीन वाटते.'